आम्ही घरी बसून काम करणारे नाही, फेसबुक लाइव्ह, ऑनलाइन काम करणारे नाही. आम्ही घरा-घरात, गावागावात जाऊन काम करणारे आहोत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. आता विकासाची गाडी सुसाट धावते आहे. सगळे अडथळे काढून टाकले आहेत. शेतीचं नुकसान झालं तेव्हा मी बांधावर नाही थेट शेतावर गेलो. तिथल्या सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन आपल्या दारी या उपक्रमा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

प्रशासन वेगाने काम करु लागलं आहे

सध्या मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी, तलाठी हे गावागावात जाऊ लागले आहे. सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम हे अधिकारी करत आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासाच्या रथाची दोन चाकं आहेत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ही दोन चाकं जेव्हा समान वेगाने धावतात तेव्हा त्या गावाचा, शहराचा त्या राज्याचा विकास होतो. आम्ही सरकार स्थापन केल्यापासून सगळे अधिकारी चांगलं काम करत आहेत. आता कलेक्टर आणि विभागीय आयुक्तही वेगाने काम करु लागले आहेत. यामुळे काय होतं की सरकारी यंत्रणा सक्रिय होते त्याचा लाभ लोकांना मिळतो.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Lakhat Ek Aamcha Dada
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील तेजू-शत्रूने शेअर केला व्हिडीओ; अधोक्षज कऱ्हाडेच्या कमेंटने वेधले लक्ष, म्हणाला…
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Mantralaya Cabins
Ministers Cabin : नवनिर्वाचित मंत्र्यांना मंत्रालयातल्या दालनांचं वाटप, चंद्रशेखर बावनकुळे ते योगेश कदम कोण कुठे बसणार? जाणून घ्या एका क्लिकवर
badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”
Sanjay Raut On MNS chief Raj Thackeray Uddhav Thackeray meet
Udhhav Thackeray-Raj Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार? भूमिका स्पष्ट करत राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे त्यांचे…”
Uddhav Thackeray Criticized Amit Shah and Modi
Uddhav Thackeray : “हिटलर आणि मुसोलिनीही भरघोस मतांनी…”; उद्धव ठाकरेंची मोदी-शाह यांच्यावर बोचरी टीका

मुख्यमंत्री असलो तरीही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे

आम्ही २४ तास काम करणारे कार्यकर्ते आहोत. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून उभा असला तरीही कार्यकर्ता म्हणून कालही काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे आणि उद्याही त्याच भूमिकेतून काम करत राहीन. काम करण्याची जी सवय आहे, बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी जी शिकवण दिली आहे, त्याच्या माध्यमातून राज्याला पुढे नेत आहोत. कुणाचीही गैरसोय होता कामा नये हे आमचं लक्ष्य आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पनाच आम्हाला नष्ट करायची आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आपल्या सरकारने आल्या आल्या ७५ हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला. बहुदा हे असं पहिलं सरकार आहे जे लोकांना बोलवून त्यांना नियुक्त्या देतं. सर्वसामान्य लोकांचं भलं करणं हेच आमचं लक्ष्य आहे. खासगी कंपन्यांचंही आम्ही जॉब फेअऱ केलं असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

Story img Loader