आमचा पाठिंबा राष्ट्रवादीला नाही. राष्ट्रवादी पक्षाने आम्हाला फसवले आहे. त्यासाठी आम्ही वैयक्तीक उदयनराजे यांना पाठिंबा दिला आहे. जर उदयनराजे यांनी आम्हाला लिहून दिलेले आश्वासन पाळले नाही तर राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलन करू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, त्यांनी भाजप हा फॅसिस्ट पक्ष आहे आणि मोदी हे ही त्याच मनोवृत्तीचे आहेत. त्यांना आमचा कायम विरोध रहाणार आहे. धर्मनिरपेक्ष पक्षाला आणि उमेदवाराला आमचा पािठबा आहे, असे ते पुढे म्हणाले.
डॉ. पाटणकर म्हणाले, देशाचे सरकार कोणत्या प्रकारचे असावे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. या प्रक्रियेमध्ये जातीयवादी, धर्माध शक्तीचा पराभव करण्याची ठाम भूमिका आहे. स्थानिक पाणी पाटबंधा—यांतून समान वाटप व्हावे, निसर्ग संपत्तीचे जतन होऊन औद्योगिक विकास व्हावा, प्रकल्पग्रस्तांच्या महिलांचे बचत गट स्थापन करावे, आदिवासी आणि जंगलवासीयांच्या हक्कांची अंमलबजावणी तातडीने करावी यासह १२ मागण्या दलाने केल्या आहेत. त्या मान्य करून त्यावर खा. भोसले यांनी स्वाक्षरी केली आहे. यापूर्वी डॉ. पाटणकर यांच्या आंदोलनाला आम आदमीच्या राजेंद्र चोरगे यांनी पािठबा दिला होता. त्याची आठवण करून त्यांना पािठबा का दिला नाही, असे विचारल्यावर डॉ. पाटणकर यांनी, ‘आप’ने आम्हाला पािठबा दिला पण अनेक मुद्दय़ांवर आपली भूमिका स्पष्ट केली नाही. तसेच त्यांचे भांडवलदारांशी असलेले संबंधही स्पष्ट होत आहेत. त्यांना तसेच त्यांच्या येथील उमेदवाराने पुनर्वसनाच्या प्रश्नाला महत्त्व दिले नाही असे आमचे मत आहे. या सगळ्या कारणामुळे आम्ही त्यांना पािठबा दिला नाही. उदयनराजे आमच्या संपर्कात आले. आमचे म्हणणे मान्य केल्यामुळे आम्ही वैयक्तीक त्यांना पािठबा दिला पक्षाला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader