विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी बुधवारी भाजपाने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. विधानपरिषदेसाठी भाजपातर्फे पंकजा मुंडे यांना संधी दिली जाणार असे सांगण्यात येत होते. मात्र ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांना संधी न मिळाल्यामुळे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी पंकजा शिवसेनेत आल्या तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >>>> विधानपरिषदेसाठी भाजपाकडून पंकजा मुंडेंना डावलण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “याचा परिणाम…”

“ठाकरे परिवाराने मुंडे परिवाराचा नेहमीच सन्मान केलेला आहे. मात्र सध्या पंकजा मुंडे यांना भाजपामध्ये असे दिवस पाहावे लागत आहेत यापेक्षा दुसरं दु:ख नाही. पंकजा मुंडे यांना संधी मिळाली असती तर मराठवाडा तसेच आम्हाल आनंद झाला असता. मात्र पक्षांतराबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या हातात नाही. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते अधिक अधिकारवाणीने बोलू शकतील. आलात तर आम्हाला आनंदच होईल,” असे अर्जुन खोतकर म्हणाले. याबातचे सविस्तर वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.

हेही वाचा >>>> मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कोणाला करणार मतदान; राज ठाकरेंनी दिले आदेश

तसेच पुढे बोलताना, पंजका मुंडे यांच्याशी मी बोलणार आहे. याबाबतची माहिती मी वरिष्ठांना देईन, अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. “माझं मुंडे घराण्यावर मुंडे घराण्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पंकजा मुंडे यांच्याशी मी बोलणार आहे. याबाबत काय मध्यस्थी करता येईल ते पाहीन. काय झालं कसं झालं हे मी ताईंना बोलेन. तसेच हे मी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याच्या कानावर टाकेन. शिवसेनेकडून काय ऑफर दिली जाऊ शकते हे सांगायचा माझा अधिकार नाही. ते वरिष्ठ ठरवतील,” असेदेखील अर्जून खोतकर म्हणाले.

हेही वाचा >>>> विधानपरिषदेसाठी श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी, पश्चिम विदर्भात पक्षविस्तारासाठी भाजपाचा नवा प्लॅन

दरम्यान, भाजपाकडून विधानपरिषदेसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस (संगठन) श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड आणि माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना मात्र संधी मिळालेली नाही. त्यानंतर आता डावलण्यात आल्यानंतर पंकजा मुंडे कोणते पाऊल उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader