महाड तालुक्यातील दाभोळ गावात पाणीपुरवठा होण्यात येणाऱ्या अडथळ्यांसदर्भात येत्या आठ दिवसांत बठक घेऊन जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल. तसेच ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीने सोडविण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दिले.
दाभोळ िरगीचा कोंड येथे कै. बळीराम सावंत व कै. सुलोचना सावंत यांच्या स्मरणार्थ प्रणय सावंत यांनी श्रीगणेश मंदिरास बांधून दिलेल्या सभामंडपाचे लोकार्पण सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी गावातील महिलांनी पाण्यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन तटकरे यांनी दिले. त्या अनुषंगाने ते बोलत होते. दाभोळ गावाला नांदवी धरणातून नियमित पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने जलसंपदामंत्री म्हणून आपण लक्ष घालू, असे तटकरे यांनी सांगितले. आईवडिलांचे ऋण फेडण्यासाठी प्रणय सावंत यांनी जे समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत, त्याचे अनुकरण सर्वानीच करावे, असे ते म्हणाले.
महाडचे आ. भरत गोगावले यांनीही आपल्या भाषणात दाभोळ गावच्या सर्वागीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू, त्यासाठी ग्रामस्थांची साथ मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, एमआयडीसीचे माजी संचालक वसंत भाई सावंत यांनी कै. बळीराम सावंत व कै. सुलोचना सावंत यांच्या स्मृतींना उजाळा देतानाच प्रणय सावंत यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. माजी आमदार शाम सावंत, रायगड जिल्हा परिषद सदस्या वैशाली सावंत, भास्कर विचारे यांनीही मनोगत व्यक्त केले.
गावचे ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण गोठल यांनी सुनील तटकरे यांचे स्वागत केले. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अ‍ॅड. राजीव साबळे, केईएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मिलिंद साळवे, माणगावचे माजी सभापती बाबुराव भोनकर, सरपंच रामचंद्र पेंढारी, राष्ट्रवादीचे बाबाजी जाधव आदींसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शिवशाहीर विजय तनपुरे यांच्या पोवाडय़ाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा