वाहतुक नियमांचे उल्लघंन करणारे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या फॅन्सी नंबर प्लेटच्या गाडीवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत.
चंद्रकांत पाटील शनिवारी सोलापूर दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी वापरलेल्या गाडीची नंबरप्लेट फॅन्सी स्टाईलने लिहिल्याचे आढळले. या गाडीची नंबर प्लेट ‘बीजेपी’ या अक्षरांमध्ये डिझाईन केली होती. या गाडीचा क्रमांक एमएच १३ सीएफ८११० असा आहे. मात्र, पाटील यांच्यासोबत असलेल्या पोलिसांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. वृत्तवाहिनीवर यासंबंधीचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर दिवाकर रावते यांनी पाटील यांच्या फॅन्सी नंबर प्लेटच्या गाडीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
एकीकडे महाराष्ट्रातले युती सरकार हेल्मेटची सक्ती करत असताना सरकारमधील मंत्रीच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सामान्यांना ज्या कायद्यांची सक्ती केली जाते ते कायदे मंत्र्यांना लागू होत नाहीत का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा