राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपा-शिंदे गटाबरोबर जाणार असल्याने शरद पवारांनी राजीनामा दिला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला पाठिंबा दिला तर शिंदे गटाची भूमिका काय असेल? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याबरोबर आली तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असं विधान शिरसाट यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाचामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली होती. त्यानंतर आता शिंदे गटाच्याच नेत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेण्याची भाषा केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवारांचा राजीनामा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलहाबद्दल विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले, “मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थोडा का होईना, पण अंतर्गत कलह आहे, हे सर्वांना मान्य आहे. परंतु शरद पवारांनी फार विचाराअंती हा निर्णय घेतला आहे. त्यांनी अलीकडेच ‘भाकरी फिरवावी लागते’ असं सांगितलं. पण त्यांनी त्याची सुरुवात स्वत:पासून केली. हेच खरं मोठ्या नेत्यांचं वैशिष्ट्ये असतं.”
हेही वाचा- “उद्धव ठाकरे दुतोंडी सापाची…”, बारसू दौऱ्यावरून रामदास कदमांची टीका
“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटेल किंवा त्यांच्यातील एक गट इकडे येईल, असं मला तरी वाटत नाही. शिवाय एक गट येऊन काय होणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडण्याचा अनेकजण प्रयत्न करतायत. पण मला तशी शक्यता फार कमी वाटते. आली तर पूर्ण राष्ट्रवादी आमच्याबरोबर येईल” अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्याबरोबर आली तर शिंदे गटाची भूमिका काय असेल? यावर राष्ट्रवादीला उद्देशून शिरसाट पुढे म्हणाले, “तुम्ही जर आमच्याबरोबर येत असाल, तर शिवसेना आणि भाजपाची जी विचारसरणी आहे, ती तुम्हाला मान्य करावी लागेल. तुम्हाला जर ती विचारसरणी मान्य असेल तर तुम्ही निश्चितपणे आमच्याबरोबर या… आम्ही तुमचं स्वागत करू… हीच आमची पहिल्यापासून भूमिका आहे.”
हेही वाचा- अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत दोन गट पडले? जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या दादागिरीमुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, या शिंदे गटाच्या भूमिकेबद्दल विचारलं असता शिरसाटांनी सांगितलं, “महाविकास आघाडी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर तयार झाली होती. त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम वेगळा होता. आमचा तसा नाही. आमचा अजेंडा ठरलेला आहे, म्हणून ते आमच्या विचाराशी सहमत असतील तर त्यांचं स्वागत करू. त्यांची विचारसरणी वेगळी होती. आम्हाला ती पसंत नव्हती. त्यामुळे आम्ही काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलो. लोकांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपाला मतदान केलं होतं. हिंदुत्वाचा विचार सोडून देणे आणि इतर गोष्टींमध्ये तडजोड करणं आमच्यासाठी शक्य नाही, म्हणून आम्ही बाहेर पडलो. आता तेच विचार जर राष्ट्रवादी काँग्रेसला आवडले, तर आम्ही त्यांचं स्वागत करू, हाच आमचा मुद्दा आहे.”