कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील एनसीसी विभागातील छात्र सैनिकांची नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये निवड झाली होती. या संचलनामध्ये सहभागी होऊन तसेच नवी दिल्ली येथील  छात्र सैनिकांच्या राष्ट्रीय शिबिरामध्ये सहभागी होऊन यश मिळवणाऱ्या दादा पाटील महाविद्यालयातील अंडर ऑफिसर प्रणव काळे, अंडर ऑफिसर भूषण राणे राजपूत, अंडर ऑफिसर ओम शेटे या तीन ही छात्र सैनिकांचे आज कर्जत शहरांमध्ये आगमन होताच ढोल ताशाच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक काढून त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी राजेंद्र फाळके अंबादास पिसाळ बाप्पाजी धांडे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर व मेजर संजय चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.रयत शिक्षण संस्थेत दादा पाटील महाविद्यालयातील एन सी सी विभागातील तीन छात्र सैनिकाची निवड भारताच्या प्रजासत्ताक दिन शिबिर करिता नवी दिल्ली येथे झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ जानेवारी ते ३० जानेवारी २०२५ नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरात दादा पाटील महाविद्यालयातील अंडर ऑफिसर प्रणव काळे, अंडर ऑफिसर भूषण राणे राजपूत, अंडर ऑफिसर ओम शेटे या तीन छात्र सैनिकांची निवड राष्ट्रीय पातळीवर लष्करी कवायत ,ड्रिल, सांस्कृतिक कार्यक्रम, शस्त्र कवायत ,फ्लॅग एरिया, वैयक्तिक स्वच्छता यामधून निवड झाली होती. या छात्र सैनिकांना मेजर डॉ. संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.या छात्र सैनिकांचे आगमन होताच प्रवेशद्वार मध्ये  औक्षण करण्यात आले. त्या नंतर ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणुकीने महाविद्यालयात त्यांना नेले. यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रजासत्ताक दिन शिबिरा करिता मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या छात्र सैनिकांचे व त्यांच्या कामगिरीचे सर्व उपस्थितितांनी भाषणामध्ये  विशेष कौतुक केले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर डॉ. संजय चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. भागवत यादव, डॉ. संजय ठुबे, डॉ. प्रमोद परदेशी, डॉ. संदीप पै, प्रा स्वप्निल मस्के ,प्रा जयदीप खेतमाळीस, प्रा. राम काळे ,  विलास मोढळे, जी सी आय प्राजक्ता पठाडे , किसन सुळ उपस्थित होते.या छात्र सैनिकांचे कॉलेज विकास समितीचे सदस्य आमदार रोहित पवार,  राजेंद्र निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे.