कीडींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनला फटका बसण्याची भीती
अखंडित बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्य़ाावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. कीडींचा प्रादुर्भाव आणि विविध रोगांचे आक्रमणामुळे सोयाबीन पिकाला बराच फटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शेतीची कामे खोळंबली असून, पिके पिवळी पडत आहेत. जिल्ह्य़ात ४ लाख हेक्टरवर कापसाची आणि साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड झाली आहे. ही दोनच नगदी मुख्य पिके या जिल्ह्य़ात आहेत. जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली आहे.
जमीन चिबाड झाल्याने तण काढायला शेतात जाता येत नाही, नदीकाठच्या शेतातील पिके खरडून गेली आहेत आणि सखल भागात पाणी साचल्याने पिके पिवळी पडली आहेत. परिणामी उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सरासरीच्या ७६ टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्य़ाची सरासरी ९११.३४ मि.मी. असून, आजपर्यंत ६६३.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. महागावात सर्वाधिक म्हणजे ९६४ मि.मी पाऊस झालेला आहे. त्या खालोखाल पुसद ७६९, दिग्रस ७४९, वणी ७४८, घाटंजी ७३७, यवतमाळ ७०६, उमरखेड ७०३, केळापूर ६६४, झरी ६२८, राळेगाव ६१६, नेर ५५९, दारव्हा ५४१, बाभुळगाव ५३९, मारेगाव ४९३ आणि सर्वात कमी कळंब ४५८ मि.मी. पाऊस झालेला आहे.
यंदा इतका पाऊस बरसला की, जिल्ह्य़ातील बेंबळा प्रकल्प वगळता सारी धरणे ओसंडून वाहत आहेत. यवतमाळ शहर आणि नजीकच्या आठ गावांना पाणी पुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह ही दोन्ही धरणे तुडुंब भरल्याने यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी आशा आहे. जिल्ह्य़ात ६२ लघुप्रकल्पात ९१ टक्के जलसाठा आहे. ३९ लघुप्रकल्प १०० टक्के, तर ८ प्रकल्पांमध्ये ९८ टक्के जलसाठा आहे.
यंदा मोठय़ा प्रमाणात झालेल्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नद्या आणि धरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. याआधी उन्हाळ्यात पाण्याची मोठय़ा प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती. तर आता नेमकी त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाल्याने शेतक ऱ्यासमोरील अडचणी कोयम राहिल्या आहेत. केंद्राने विविध पिकोंसाठी प्रोत्साहन दिल्यानंतर पावसाने शेतक ऱ्याचे नुकसान केले. विजेचे १७ बळी यंदाच्या पावसासह कोसळलेल्या विजांनी १७ जणांचे बळी घेतले आहेत. पुरात ९ जण वाहून गेले. १३५२ कच्च्या घरांची पडझ झाली. बऱ्याच जणांचे संसार उघडय़ावर आले असून, नसíगक आपत्तीत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना शासनाने ४० लाख रुपयांची मदत केली आहे.