शिवसेनापाठोपाठ वर्षभराने राष्ट्रवादीतही फूट पडल्याने महाविकास आघाडीबाबत चिंता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीतील किती आमदार शरद पवारांसोबत आहेत आणि किती अजित पवारांसोबत आहेत हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची विधानसभेतील ताकद थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल. तुर्तास भाजपानंतर राज्यात शिवसेना आणि काँग्रेस हेच दोन प्रमुख पक्ष उरले आहेत. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> “भाजपाने दोन भ पाळलेत”, नाना पटोलेंचा हल्लाबोल; म्हणाले, “ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून…”

“बरं झालं गेले, जागा मोकळी झाली. पवार साहेबांनी कसाबसा प्रयत्न केला. दोन्ही पक्षांच्या विचारांमध्ये, कामात फरक आहे. पक्ष म्हणून त्यांची भूमिका स्वीकारली आहे. आता काँग्रेसला अधिक वाव आहे. अधिक जागा लढण्याकरता संधी आहे”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

हेही वाचा >> “अजित पवारांनी तीन वेळा प्रयत्न केले”, संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, “मी ऑन कॅमेरा सांगतो की…!”

“काही जागा राष्ट्रवादीकडे गेल्या, काही जागा ठाकरेंकडे गेल्या होत्या. पण आता पूर्वीप्रमाणेच राज्यात दोन प्रमुख पक्ष उरले आहेत. पवार साहेब काय करतात माहित नाही. किती लोक गेलेत माहीत नाहीत. ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना बोलण्याएवढा मी मोठा माणूस नाही. जेवढे आमदार शिल्लक राहिलेत याबाबत काय भूमिका घ्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. पण, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, ठाकरेंसोबत बोलणं झालं आहे. आपण दोघं एकत्र मिळून महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये कायम ठेवू. एकत्र येऊन महाराष्ट्रातील आगामी काळातील निवडणुका लढवू, असं ठरलं आहे”, अशी माहितीही अशोक चव्हाणांनी दिली.