केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आमदारपुत्र नितेश राणे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर ट्वीटरवरुन गंभीर आरोप केलेत. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची अनेकदा सुपारी दिल्याचा आरोप नितेश यांनी केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सध्या महाराष्ट्रभर शिवसंवाद यात्रा करणाऱ्या आदित्य ठाकरेंवरही टीका केलीय. यावेळी नितेश यांनी करोना काळात आदित्य ठाकरे अभिनेता डिनो मोरिया घरी सायंकाळी सात वाजता काय करायचे असा प्रश्नही विचारलाय.

नक्की वाचा >> “मुलाबाळांच्या प्रतिक्रियेवर मी…”; उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंची सुपारी दिल्याच्या नितेश राणेंच्या आरोपांवर शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ट्वीटमध्ये काय म्हणालेत नितेश राणे?
नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनेकदा सुपाऱ्या दिल्या होत्या असं नितेश राणेंनी ट्वीटरवरुन म्हटलं आहे. “माझ्या वडिलांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा एकनाथ शिंदेप्रमाणेच त्यांनाही मारण्यासाठी तथाकथित शांत आणि संयमी पक्षप्रमुखांकडून सुपाऱ्या देण्यात आल्या. हे ‘म्याव म्याव’ आता संपवून टाकूया आणि आपण व्याजासह वस्त्रहरण सुरु करु,” असा आरोप नितेश राणे यांनी ट्वीटरवरुन केला आहे.

नक्की वाचा >> ‘दिल्लीच्या आदेशानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले तर फडणवीस उपमुख्यमंत्री’ यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “त्यांनी दगड…”

म्याव म्यावचा उल्लेख करत शिवसेनेला डिवचलं
याच ट्वीटसंदर्भात पत्रकार परिषदेमधून माहिती देताना नितेश यांनी आदित्य ठाकरेंवरही टीका केली. “महाराष्ट्रात दौरे काढले जातायत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून म्याव म्यावचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहचतोय. म्हणून मी एवढं सांगितलं की हे म्याव म्यावचे आवाज बंद झाल्यानंतर कसं काय वस्त्रहरण होतं हे महाराष्ट्रासमोर आम्ही सुद्धा दाखवू, त्यासाठीच मी मुद्दाम असे ट्वीट केले आहेत. या माध्यमातून जो एकंदरीत आव आणला जातोय त्याबद्दल मला बोलायचं आहे.” असा इशारा नितेश यांनी शिवसेनेला दिलाय.

पाहा व्हिडीओ –

नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”

आदित्य ठाकरेंना केलं लक्ष्य
“असंही म्हटलं जातंय की पक्षप्रमुख (उद्धव ठाकरे) आजारी असताना यांनी (बंडखोरांनी) गद्दारी केली. मग मुंबईचे लोक जेव्हा करोनाच्या नावाने मरत होते, आजारी होते तेव्हा मुंबईचे पालकमंत्री असताना हे पर्यटनमंत्री नेमकं संध्याकाळी सात वाजता डिनो मोरियाच्या घरी काय करायचे?” असा प्रश्न नितेश राणेंनी विचारलाय. पुढे बोलताना त्यांनी, “एका बाजूला मुंबईचे लोक करोनामध्ये त्रस्त दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे संध्याकाळी सातच्या नंतर डिनो मोरियाच्या घरी काय करायचे? तेव्हा त्यांना (वडिलांचं आजारपण) काही दिसलं नाही का?” असंही नितेश यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

नक्की वाचा >> शिंदे विरुद्ध ठाकरे: निवडणूक आयोगाने बहुमताचा पुरावा सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर राऊत म्हणतात, “वरुन बाळासाहेबांचा आत्मा…”

मी ट्रेलर पुरतं ट्वीट केलं…
“आपले वडील आजारी आहेत पण दुसऱ्यांच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरुन उठवताना तुम्हाला समाधान वाटतं का? हा प्रश्न मला आदित्य ठाकरेंना विचारायचाय. त्यामुळे मी ट्रेलर पुरतं ट्वीट केलं आहे. उरलेलं वस्त्रहरण मी म्याव म्याव संपल्यानंतर करणार आहे,” असंही नितेश यांनी सांगितलं आहे.