मराठवाड्यातला अग्रेसर असा विलासराव सहकारी कारखाना आहे. आजवर आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेने या कारखान्याला ४० पुरस्कार लाभले आहेत. आता आपल्यापुढे येणारा काळ हा सोपा नाही तो संघर्षाचा आहे लक्षात घेतलं पाहिजे. विलासराव देशमुख यांचं स्मरण केलं तर आपल्याला लक्षात येईल की निष्ठा काय असते. निष्ठेने समाजाचं काम करणं, राजकारण करणं, पक्षाचं काम करणं हे सगळं विलासराव देशमुख यांनी केलं. मध्यंतरी असेही प्रसंग आले की ज्यामुळे विलासराव देशमुख यांच्यावर कारवाई झाली. मात्र त्या काळातही विलासरावांनी पत्रकारांना सांगितलं की मला काँग्रेसमधून काढाल पण रक्तातली काँग्रेस कशी काढणार? विलासराव देशमुख यांचं हे वाक्य आजच्या राजकीय परिस्थितीतही लक्षात घेण्यासारखं आहे. माझ्याबद्दलही लोकांनी अनेक चर्चा केल्या. पण मी लोकांना, माध्यमांना सांगितलं मी जिथे आहे तिथे ठीक आहे.
विलासरावांवर कारवाई झाली पण त्यांनी पक्ष सोडला नाही
देशात आणि राज्यात जी परिस्थिती पुढे आली ती म्हणजे समाजाशी जोडलेली नाळ तोडून इकडे तिकडे जाणं हे घडतं आहे. मला खात्री आहे महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला हे न पटणारं आहे. यावर आपल्याला मात करायची आहे. आपल्याला सामान्य माणसांचा विश्वास संपादन करुन आदरणीय यशंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख आणि शरद पवार यांचे. सामान्य माणासापर्यंत महाराष्ट्राचा विचार पोहचवणं ही आपली भूमिका असली पाहिजे असंही अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.
तो काळ परत आणायचा आहे
आदरणीय शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे या सगळ्यांकडे आस लावून महाराष्ट्रातला माणूस पाहतो आहे. सामान्य माणसांच्या आशा जर पूर्ण करायच्या असतील तर आपल्यावर ही सगळी जबाबदारी महाराष्ट्राने सोपवली आहे. आम्ही आपल्या बरोबर आहोत हे सगळ्यांना मी जाहीरपणे सांगतो आहे.
हे पण वाचा- भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर अमित देशमुखांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “आमची…”
आज आपल्यासाठी आनंदाचा क्षण
आज विलासराव सहकारी साखर कारखान्यासाठी आनंदाचा क्षण आहे. या कारखान्यात आपल्या नेत्याचं स्मारक व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा होती. आपल्या नेत्याने ज्या माळरानाचं नंदनवन केलं आज या नंदनवनात आमचा विठ्ठल उभा आहे अशी भावना आमच्या मनात आहे असंही अमित देशमुख म्हणाले. आज लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं या स्मृती सोहळ्यात अमित देशमुख यांनी भाषण केलं.