Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. यामुळे भाजपात प्रचंड उत्साह आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर तीन राजकीय रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नेतेपदी एकमुखाने निवड

मुंबईत आज भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांची एकमुखाने निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव महायुतीकडून ठरल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद पाहण्यास मिळाला. देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल मराठवाड्यासह राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी फडणवीसांवर अभिनंदनचा वर्षाव केला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या नावावर कुठले तीन रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत? हे आपण जाणून घेऊ.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणं

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या नावावरचा पहिला रेकॉर्ड आहे तो तीन वेळा मुख्यमंत्री होण्याचा. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. २०१९ मध्ये ७२ तास म्हणजेच तीन दिवसांसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या भाषणातही हा उल्लेख केला. की त्यांना सलग तीनदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. मी २०१९ मध्ये तीन दिवसच मुख्यमंत्री राहू शकलो असंही देवेंद्र फडणवीस मिळाले. यानंतर आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस करत आहेत. शरद पवारांच्या नंतर तीनदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

हे पण वाचा- Maharashtra New CM: दहा वर्षांत देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी, काय घडलं गेल्या दशकभरात?

तीनवेळा १०० हून अधिक आमदार निवडून आणणं

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या नेतृत्वात तीन विधानसभा निवडणुका लढवण्यात आल्या. या तिन्ही निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी १०० हून अधिक आमदार निवडून आणले. एखाद्या पक्षाचे आमदार सलग तीनवेळा निवडून आणणं ही किमया फक्त देवेंद्र फडणवीस यांनी साधली आहे. आपण जाणून घेऊ कुठल्या वर्षी भाजपाचे किती आमदार होते.

कुठल्या वर्षी भाजपाचे किती आमदार?

२०१४ ची विधानसभा निवडणूक – १२२ आमदार
२०१९ ची विधानसभा निवडणूक – १०५ आमदार
२०२४ ची विधानसभा निवडणूक – १३२ आमदार

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे २०१९ मध्ये भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागलं. तसंच जेव्हा २०२२ मध्ये महायुतीचं सरकार आलं तेव्हा भाजपाला मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. तरीही १०५ पैकी एकही आमदार भाजपा सोडून गेला नाही. या गोष्टीचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनीही केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेला तिसरा विक्रमही खास असाच आहे.

उपमुख्यमंत्री झालेला नेता मुख्यमंत्री होत नाही हा प्रघात मोडला

महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री झालेला नेता मुख्यमंत्री होत नाही हा प्रघात मोडण्याचा रेकॉर्डही देवेंद्र फडणवीस यांच्या नावे नोंदवला गेला आहे. याआधी छगन भुजबळ, अजित पवार, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज जे उपमुख्यमंत्री या पदापर्यंत पोहचले पण मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. त्यामुळे राजकारणात असा प्रघातच पडला होता की उपमुख्यमंत्री झालेला नेता मुख्यमंत्री होत नाही. देवेंद्र फडणवीस हे २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री झाले. आता २०२४ मध्ये प्रचंड बहुमतासह मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नावे हा पारंपरिक प्रघात मोडण्याचा रेकॉर्डही नोंदवला गेला आहे.

Story img Loader