लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रात लागलेला निकाल महायुतीसाठी जबरदस्त धक्कादायक होता. कारण महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या तर महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावं लागलं. अजित पवारांना बरोबर घेतल्याचा फटका भाजपाला बसला अशी चर्चा सुरु झाली. ही चर्चा सुरु होण्याचं कारण होतं ते म्हणजे संघाच्या मुखपत्रात आलेला लेख.

छगन भुजबळ यांनीही मांडली भूमिका

अजित पवारांना बरोबर घेतल्याने भाजपाचं नुकसान झालं का? ऑर्गनायझरमध्ये लेख आहे, याबाबत काय सांगाल? हे विचारताच भुजबळ म्हणाले, ” होय, त्यांनीच नाही तर अनेकांनी टीका केली आहे. काँग्रेसच्या लोकांना बरोबर घेतल्याने नुकसान झाल्याचंही म्हटलं आहे. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. आम्हालाही बरोबर घेतलंय. ऑर्गनायझरची जी भूमिका आहे ती एकंदरीत योग्य आहे.” असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. त्यांच्या या उत्तराने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या वक्तव्यामुळे आणि गेल्या काही दिवसांमध्ये आलेल्या वक्तव्यांमुळे छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा आहेत. ते शरद पवारांबरोबर जातील अशाही चर्चा रंगल्या आहेत. त्यावर आता छगन भुजबळ यांनीच उत्तर दिलंय.

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
ajay devgan and aamir khan
‘इश्क’च्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; ‘वाचवा, वाचवा’ म्हणत आमिर खान ओरडला अन् अजय देवगणने धावत्या कारमधून…
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

हे पण वाचा- ‘पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाही,’ छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य

नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळ काय म्हणाले?

अजित पवारांबरोबर नाराज आहात का? हे विचारलं असता भुजबळ म्हणाले, “नाराजी कशाबद्दल? मला ५७ वर्षे राजकारणात झाली आहेत. शिवसेनेला जितकी वर्षे झाली आहेत, तेवढी राजकीय वर्षे माझ्या कारकिर्दीची आहेत. मी शिवसेनेत होतो तेव्हापासून पाहतोय, अडचणी येतात आणि जातात. १९८५ मध्ये शिवसेना विधानसभा निवडणुकीला उभी राहिली होती. त्यावेळी मनोहर जोशी वगैरे सगळे पडले होते. मी निवडून आलो होतो. ती निवडणूक मी मशाल चिन्हावर लढवली होती. कारण त्यावेळी शिवसेनेला चिन्ह मिळालं नव्हतं. मी निवडून आलो नसतो तरीही नाराज न होता काम करायचंच ठरवलं होतं. त्यानंतर मी बाळासाहेब ठाकरेंनाही जवळून पाहिलं. त्यांच्यावरही अनेक संकटं आली पण ते डगमगले नाहीत. माझ्यासमोर त्यांचा आदर्श आहे.”

शरद पवारांचाही आदर्श माझ्यासमोर

“महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवणार हा दुर्दम्य आशावाद बाळासाहेब व्यक्त करायचे. त्यामुळे शिवसेना पुढे गेली. मी शरद पवारांसह काम करत होतो त्यावेळी पराभवाचे चटके बसले. पण शरद पवारही डगमगले नाहीत. १९९५ मध्ये आम्ही सगळे काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी आमचं सरकार गेलं. पण आम्ही कामाला लागायचं असं शरद पवारांनी सांगितलं होतं. पराभव झाला तरीही कामाला लागायचं असतं. हे मी शिकलो आहे. अडचणी आल्या की जनतेत जायचं. राजकारणात ज्या भूमिकेत मी असतो त्या भूमिकेत असतो. ” असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण नाराज नाही असं म्हटलं आहे.