सांगली : राज्यात दारुबंदीसाठी शासकीय आदेश काढले तरी जोपर्यंत लोक ठरवत नाहीत तोपर्यंत दारुबंदी होणे अशक्य असल्याचे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मिरज व सांगलीतील शासकीय रुग्णालयांची पाहणी केल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बिअरचा खप वाढावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, शासनाने दारुबंदी केली तर अन्य मार्गाने त्या ठिकाणी दारू उपलब्ध होते. काही वेळा बनावट दारूची विक्रीही होत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. यामुळे जोपर्यंत प्रबोधन करून मद्य सेवनापासून लोकच परावृत्त होत नाहीत तोपर्यंत दारुबंदी निर्णयाचा अपेक्षित परिणाम होत नाही, असे आढळून आले आहे. सांगली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ५०० खाटांचे आणि मिरज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे २५० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव पूर्वीचा असून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
शासकीय रुग्णालयात कर्मचार्यांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचे प्रयत्न असून ४० टक्के औषध खरेदी जिल्हाधिकारी व अधिष्ठाता स्तरावर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एमआरआय व सिटी स्कॅन यंत्रणा शासकीय रुग्णालयात लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
तत्पूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासमवेत जिल्हा व वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यांची पाहणी करून आवश्यक गरजांची निकड जाणून घेतली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, सहायक अधिष्ठाता डॉ. रुपेश शिंदे आदी उपस्थित होते.