गरज ही शोधाची जननी आहे. आपल्याकडे शोध इच्छेमुळे किंवा गरजेमुळे लागले. शास्त्रज्ञांचा आदर आपण केलाच पाहिजे. आजूबाजूला नजर टाकली तरीही लक्षात येईल की शोध म्हणजे काय? मोबाइल फोन आपल्या हाती आलाय. त्याचा शोध, टेलिफोनचा शोध कुणी लावला? दिव्याचा शोध कुणी लावला? या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत हव्या असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

आपण फक्त मुलं जन्माला घालण्याचा शोध लावला

“इतक्या शास्त्रज्ञांनी इतके चमत्कार आपल्या जगात घडवले आहेत. मात्र मी आजपर्यंत त्यांचं कधी होर्डिंग पाहिलं नाही. आमच्याकडे कोणतेही शोध न लावता.. आपण फक्त मुलांचा शोध लावला. होर्डिंगवर फोटो असतात मुन्नाचा वाढदिवस, अरे कोण मुन्ना? मुलं जन्माला घालण्यापलिकडे आपण कुठला शोध लावला?” असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे. मुंबईतल्या भाषणात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…

शास्त्रज्ञ कधीही स्वतःचं होर्डिंग लावत नाहीत

राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, शास्त्रज्ञ कधीही स्वतःचं होर्डिंग लावत नाहीत. ते त्यांचं काम करुन नामानिराळे होतात, जगाला भरभरुन देत असतात. अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. विज्ञान म्हटलं की आपल्याकडे फक्त रॉकेटचा विचार केला जातो. पण विज्ञानात पेनाच्या शोधापासून, चाकापासून अनेक शोध लागले. सगळ्या गोष्टींचं भान बाळगून आपण सगळ्या शास्त्रज्ञांचे आभार मानले पाहिजेत.

आणखी काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे म्हणाले, संजय नाईक यांनी विज्ञान प्रकल्प स्पर्धेचं आयोजन केलंय असं समजल्यावर मला धक्काच बसला. पण नंतर त्यांनी या कार्यक्रमातील इतर मंडळीही दाखवली. मग माझा विश्वास बसला. पोरितोषिक स्वीकारताना मुलांमधील उत्साह क्रिकेट मॅचवेळेला पारितोषिके मिळतात त्यासारखा होता. विज्ञान विषयात पारितोषिके मिळवून विद्यार्थी उड्या मारत आहेत, हे पाहून मलाही आश्चर्य वाटलं.

“ठराविक संपादक, ठराविक काही राजकीय पुढारी असतात. सकाळपासून ते चॅनेलवर बोलायला सुरुवात करात. त्यांना असं वाटतं की त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं. पण काही कळत नसतं, पण कॅमेरा समोर आला की बोलावं लागतं. त्याप्रमाणे मला काही सगळ्यातलं सगळं कळत नाही. शास्त्रातले पंडित येथे बसलेले आहेत, त्यामुळे मी फार बोलणार नाहीत”, अशी अप्रत्यक्ष टीकाही राज ठाकरे यांनी केली.

Story img Loader