ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत मोठं विधान केलं आहे. बंडखोरी करण्यापूर्वी एकनाथ शिंदे घरी (वर्षा निवासस्थानी) येऊन रडले होते, असं विधान आदित्य ठाकरेंनी केलं. आदित्य ठाकरेंच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सर्व घडामोडीनंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे ज्यादिवशी घरी येऊन रडले, त्यादिवशी नेमकं काय घडलं? याचा खुलासा केला. ‘मुंबई तक’च्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे म्हणाले, “नोव्हेंबर महिन्यात मी ग्लासगोला गेलो होतो. तिथे उद्धव ठाकरेंची शस्त्रक्रिया होणार होती. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया तातडीने झाली. शस्त्रक्रियेनंतर पुढचा दीड-दोन महिन्याचा काळ उद्धव ठाकरे बबलमध्ये होते. ते कुणाला भेटू शकत नव्हते. त्यांचे हातपाय हालत नव्हते. तेव्हा मीही किमान पाच कोविड टेस्ट केल्यानंतर दोन-तीन तासांनी त्यांना भेटायचो.”

हेही वाचा- मनसे नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, “आम्ही…”

“अर्थात या काळात मी या गँगला (शिंदे गटाला) भेटायचो. पण त्यावेळी कदाचित ४० लोकांच्या गँग लीडरला (एकनाथ शिंदे) असं वाटलं की, उद्धव ठाकरे आता परत उभं राहू शकत नाहीत, पक्ष उभा राहू शकणार नाही, मग दिवाळीत यांनी काही आमदारांना जे काही द्यायचं होतं, ते दिलं.हे सगळं आमच्या कानावर येत होतं. तरीही आम्हाला विश्वास बसत नव्हता. यांच्याबरोबर गेलेल्या दोन-तीन आमदारांनी १५ मे रोजी घरी येऊन सांगितलं की, ते फार्महाऊसला का जातायत? मोबाइल का बंद असतो? दिल्लीला किंवा अहमदाबादला तर जात नाहीत ना? तुम्ही लक्ष का ठेवत नाही? ते आम्हाला पैसे का देत आहेत? हे सगळं झालं. तरीही ते मंत्री आहेत, त्यांना तुम्हाला निधी द्यावा लागतो, असं आम्हाला वाटायचं” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा- राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार का? शरद पवारांनी दिलं तीन शब्दात उत्तर, म्हणाले…

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “२० मे रोजी मी डाव्होसला असताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावलं होतं. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? असं विचारलं. पक्ष पुन्हा उभा राहणार नाही, उद्धव ठाकरे पुन्हा उभे राहणार नाहीत, अशा घडामोडी का कानावर येत आहेत? नक्की तुमची समस्या काय आहे? असं विचारलं. मग ते उद्धव ठाकरेंसमोर रडले. हे तुरुंगात जाण्याचं वय नाही, असं त्यांनी सांगितलं. मूळ गोष्ट हीच आहे की, ते भीतीमुळे तिकडे गेले.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happened on that day when cm eknath shinde cried in front of uddhav thackeray aaditya thackeray reaction rmm