पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अगोदर आपली कुवत आणि उंची काय हे सांगावे असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे खासदार संजयकाका पाटील यानी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले. लोकसभा निवडणुकीत राजकारण सोडण्याचे दिलेले आव्हान गृहमंत्री पाटील यांनी स्वीकारले नसल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले की, महायुतीचे जागा वाटप अद्याप झालेले नाही, भाजपाची कोअर कमिटी याबाबत निर्णय घेणार असून घटक पक्षांना काही जागा द्याव्या लागणार आहेत. भाजपा आपले उमेदवार निश्चित करीत असताना स्थानिक पातळीवरून आलेल्या अहवालावर निर्णय घेईल.
जिल्ह्यात असणाऱ्या आठही विधानसभा मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळाले असून हे ताकद वाढली असल्याचेच लक्षण आहे. येत्या निवडणुकीतही महायुतीला अनुकूल वातावरण असून जिल्ह्यातील काही नेत्यांचा पक्षप्रवेश जागावाटपानंतर होण्याच्या शक्यतेला खा. पाटील यांनी मौन पाळून बगल दिली.

Story img Loader