केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासात त्यांचा उडालेला गोंधळ असो, रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्याबाबतचे वृत्त असो, चिपळूणमध्ये घडलेला हिंसाचार असो, अशा विविध कारणांनी नारायण राणेंची माध्यमांत बरीच चर्चा आहे. आता त्यांचा आणखी एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नारायण राणेंच्या व्हायरल व्हीडिओमध्ये काय दिसतंय?

CIBIL score मुळे नॅशनॅलाइजेड बँक प्रकरणं रिजेक्ट करतात, यासंदर्भात पत्रकारांनी नारायण राणेंना प्रश्न विचारला. परंतु, सिबिल स्कोर म्हणजे काय हेच नारायण राणेंना आठवेना. त्यामुळे सिबिल म्हणजे काय असा प्रतिप्रश्न पत्रकारांना राणेंनी विचारला. तेवढ्यात त्यांच्या मागे असलेल्या व्यक्तीने त्यांना सिबिलचा अर्थ समजावून सांगितला. त्यानंतर नारायण राणेंनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. बँक रिकामी झाल्यानंतर त्यांना कर्ज कोण देणार? असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं.

हेही वाचा >> संसदेत सोप्या प्रश्नावर नारायण राणेंचा गोंधळ, दिलं भलतंच उत्तर? ‘तो’ व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”

अंजली दमानिया यांची टीका काय?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हीडिओ प्रसिद्ध केला. त्यावर त्या म्हणाल्या, “हे आपले महाविद्वान MSME मंत्री! भाईसाहेबांना CIBIL score म्हणजे काय हे माहित नाही. प्रश्न : CIBIL score मुळे नॅशनॅलाइजेड बँक प्रकरणं रिजेक्ट करतात. त्यावर भन्नाट उत्तर… MSME म्हणजे काय हे तरी यांना माहित आहे का? असा प्रश्नही अंजली दमानिया यांनी विचारला. तसंच,
“मंत्री आहेत म्हणे…”, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

संसदेत काय झाला होता गोंधळ?

अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळीही नारायण राणेंचा सभागृहात गोंधळ झाला होता. यावेळीही अंजली दमानिया यांनी व्हीडिओ शेअर केला होता. सभागृहात खासदार कार्तिकेय शर्मा यांनी नारायण राणे यांना प्रश्न विचारला होता की, एमएसएमई (सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग) सेक्टरमधील कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने काय पावलं उचलली आहेत? परंतु, या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी नारायण राणे यांनी एमएसएमई सेक्टरमध्ये निर्यात कशी वाढवणार? कारखाने कसे सुरू होणार याबाबतची माहिती वाचून दाखवण्यास सुरुवात केली. राणे म्हणाले, मी तुम्हाला वाचून दाखवतो, निर्यातीच्या क्षेत्रात एमएसएमईची हिस्सेदारी वाढवण्यासाठी, स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सरकारने मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत व्यवसायाची सुगमता आणि संवर्धनासाठी प्रयत्न केले. तसेच या क्षेत्रातील उपलब्धता वाढवण्यासाठी प्रयत्न केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is cibil score narayan ranes new video shared by anjali damania sgk
Show comments