Petrol Diesel Rate On 8 January : आज ८ जानेवरी २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तसेचदेशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत जाहीर करतात. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे आज महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rate)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.४३९०.९५
अकोला१०४.११९०.६८
अमरावती१०४.७८९१.३२
औरंगाबाद१०४.९९९१.४९
भंडारा१०४.८८९१.४१
बीड१०५.५०९२.०३
बुलढाणा१०५.३८९१.९०
चंद्रपूर१०४.१०९०.६७
धुळे१०४.८२९१.३३
गडचिरोली१०५.२४९१.७७
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.०५९१.५७
जळगाव१०४.७२९१.२३
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.४४९०.०९
लातूर१०५.२२९१.७३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०४९०.६०
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.७५९१.२६
उस्मानाबाद१०४.८९९१.४२
पालघर१०३.९२९०.४३
परभणी१०५.४९९२.०३
पुणे१०४.०४९०.५७
रायगड१०४.४१९०.९०
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.०२९०.५९
सातारा१०४.६०९१.११
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.४६९१.००
ठाणे१०३.७५९०.२६
वर्धा१०४.८८९१.४१
वाशिम१०४.९५९१.४८
यवतमाळ१०५.४३९१.९४

आज महाराष्ट्रातील काही शहरांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कारण – पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rate) आज कमी झालेले दिसून आले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता…

हेही वाचा…Smart Driving Tips : हिवाळ्यात विंडशिल्डवरील धुके कसे काढाल? मग ही वाचा सोपी ट्रिक; प्रवास होईल सुरक्षित

घरबसल्या चेक करा दर (Petrol Diesel Rate)

तुम्ही घसबसल्या आता दर चेक करू शकता. तुम्ही या किमती फक्त एसएमएसद्वारेच तपासू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक, त्यांच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी, चेक RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 वर पाठवा. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस पाठवतात. BPCL ग्राहकांनी RSP<डीलर कोड> 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर काही मिनिटांत तुम्हाला एसएमएसद्वारे नवीन किंमती मिळतील.

हिवाळ्यात कारच्या विंडशिल्डवरील धुके कसे काढाल?

थंडीत तापमानात घट झाल्यामुळे दाट धुक्याने विविध भागांना वेढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, कमी दृश्यमानतेमध्ये वाहन चालविण्याशी संबंधित समस्यांचा वाहनचालकांना त्रासही होतो. त्यामुळे थंडीत धुक्यामध्ये अपघात टाळण्यासाठी गाडी चालवताना प्रत्येक वाहनचालकाने काळजी घेणे आवश्यक आहे. तर अशा हवामानाच्या परिस्थितीत नेव्हिगेट करण्यात तुम्हाला मदत करण्याच्या दृष्टीने सुरक्षित वाहन चालवण्याबाबतच्या काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्या खालीलप्रमाणे :
१. कमी दृश्यमानता असलेल्या मार्गावर वाहन चालवताना, चालकांनी सावधगिरीने पुढे जाणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहनचालकांनी ॲक्सिलेटर सांभाळत वेगावर नियंत्रण ठेवावे.
२. दाट धुक्यातून चालकांना मदत करण्यासाठी रस्ते अनेकदा पांढऱ्या किंवा पिवळ्या रेषांनी चिन्हांकित केले जातात. त्यामुळे मार्गिकेची योग्य स्थिती राखण्यास मदत मिळू शकते
३. हिवाळ्यात विंडशिल्ड्सवर ओलावा निर्माण होऊ शकतो; ज्यामुळे चालकाच्या समोरचे दृश्य पाहण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. विंडशील्ड वायपर वापरल्याने विंडशील्ड्सवरील ओलावा साफ होण्यास मदत होते. डीफॉगर आतून कंडेन्सेशन काढून टाकू शकतो.

Story img Loader