महाराष्ट्राचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचं निधन झालं. सोमवारी ४६ वर्षीय मनाली राजेंद्र घनवट यांनी पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मात्र हा मृत्यू नैसर्गिक नाही तर आत्महत्या आहे अशी चर्चा होते आहे. हे प्रकरण काय आणि हा आरोप का होतो आहे? जाणून घेऊ.

राजेंद्र घनवट यांच्यावर अनेक आरोप

धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेले राजेंद्र घनवट यांच्यावर राजकारण्यांना हाताशी धरुन शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा ठपका आहे. मयत व्यक्तीला जिवंत दाखवलं आणि जिवंत लोकांचा मृत्यू झाल्याचं दाखवून व्यवहार केले असाही आरोप झाला आहे. राजेंद्र घनवट यांच्यावर झालेल्या या गंभीर आरोपांना काही दिवस उलटतात न उलटतात तोच त्यांची पत्नी मनाली राजेंद्र घनवट यांचं निधन झालं. सोमवारी म्हणजेच २१ एप्रिलला ही घटना घडली. त्या ४६ वर्षांच्या होत्या. त्यांचा मृत्यू अकस्मात झाला असं बोललं जात असतानाच हा मृत्यू नैसर्गिक नसून आत्महत्या आहे अशी चर्चा रंगली आहे. याचं कारण आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलेली पोस्ट.

कोण होत्या मनाली घनवट?

मनाली घनवट या राजेंद्र घनवट यांच्या पत्नी होत्या

मनाली घनवट ४६ वर्षांच्या होत्या

मनाली घनवट यांना पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मनाली घनवट यांचा मृत्यू २१ एप्रिल रोजी झाला.

मनाली घनवट यांच्या मृत्यूबाबत प्रश्न का उपस्थित होत आहेत?

मनाली घनवट यांच्या मृत्यूबाबत संशय का व्यक्त होतो आहे?

मनाली राजेंद्र घनवट यांच्या मृत्यूबाबत प्रश्न का?

मनाली राजेंद्र घनवट यांचा मृत्यू का झाला? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. कारण रुग्णालय प्रशासनाने याबाबतचं कुठलंही निवेदन अद्याप जारी केलं नाही. त्यामुळे अंजली दमानियांनी एक पोस्ट लिहून संशय व्यक्त केला. त्यामुळे या मृत्यूवरुन चर्चा रंगली आहे.

अंजली दमानियांनी काय म्हटलं आहे?

खूप खूप धक्कादायक !
“राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत, याच राज घनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. मनाली राजेंद्र घनवट यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती आत्महत्या असल्याचा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. यामुळेच मनाली घनवट यांच्या मृत्यूची चर्चा रंगली आहे.