नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील या सकाळपासून नॉट रिचेबल होत्या मात्र दुपारी त्या विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या. शुभांगी पाटील नेमक्या गेल्या कुठे ? त्या नॉट रिचेबल का? हे प्रश्न सगळ्यांनाच पडले होते. दुपारी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी माघार घेतलेली नाही.

शुभांगी पाटील यांनी माध्यमांना हे सांगितलं की नुकतीच मी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मला ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. मला नाना पटोले आणि अजित पवार आणि जयंत पाटील हे पक्षश्रेष्ठी मला पाठिंबा देतील. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर करतील असंही शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे. मी माघार घेतलेली नाही घेणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा – नाशिक पदवीधरमध्ये कोण कोणाचे हा संभ्रम

नॉट रिचेबलविषयी काय?

शुभांगी पाटील यांना विचारण्यात आलं की तु्मही कालपासून कुठे होतता? तुम्ही जे विचारत आहात त्याबद्दल काही न बोललेलं बर असं शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे.जनतेने धनशक्ती की धनशक्ती की जनशक्ती हे जनता ठरवेल. मला नक्की विश्वास आहे की जनतेने महाविकास आघाडीवर विश्वास केला असेल. दोन तारखेला धनशक्ती जिंकते की जनशक्ती जिंकते हे स्पष्ट होईल असंही शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा – ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील नॉटरिचेबल; भाजपा नेते गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले…

शुभांगी पाटील यांची एवढी चर्चा होते आहे त्या कोण आहेत?

शुभांगी पाटील यांनी बीए. डिएज. एम.ए. बी.एड. आणि एलएलबी या पदव्या घेत आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. शुभांगी पाटील या धुळ्यातील भास्कराचार्य संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र स्टुडंट असोसिएशन ही संस्था त्यांनी स्थापन केली. शुभांगी पाटील या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

शुभांगी पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न होत्या. त्यानंतर पुढे जात २१ सप्टेंबर २०२२ ला शुभांगी पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. भाजपाने जेव्हा सत्यजीत तांबेंच्या माध्यमातून आपली चाल खेळली तेव्हा शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीशी संपर्क केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the first comment on shubhangi patil after she came to nashik office what did she say about not reachable remark scj
Show comments