Manoj Jarange: मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. अशात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहण्यास मिळतो आहे. मनोज जरांगे टीकेला उत्तरं देत आहेत. प्रकाश आंबेडकर आणि पंकजा मुंडे या दोघांनाही जरांगेंनी उत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जो आरोप केला तो माझ्यासाठी शॉकिंग आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले मनोज जरांगे?

मला मराठा समाजाची शक्ती वाढवायची आहे. मराठा समाज मोठा व्हावा हे माझं स्वप्न आहे. मात्र अनेकांना तसं वाटत नाही. मराठा समाज मोठा व्हावा असं अनेकांना वाटत नाही. बच्चू कडूंनी मला ऑफर दिली आहे, त्याबाबत समाजाच्या बैठकीत २९ ऑगस्टला निर्णय घेऊ असं मनोज जरांगेंनी ( Manoj Jarange ) म्हटलं आहे. तसंच प्रकाश आंबेडकरांचा आरोप शॉकिंग असल्याचंही मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले.

Manoj Jarange On Maharashtra Politics : गुप्त बैठकांच्या चर्चांवर मनोज जरांगेंचं मोठं विधान; म्हणाले, “राजकारणात काही गोष्टी…”

प्रकाश आंबेडकरांचा आरोप शॉकिंग

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपांवर माझा विश्वासच बसत नाही. प्रकाश आंबेडकरांचे आरोप माझ्यासाठी शॉकिंग आहेत. मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण नकली आहे. मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली होती. त्यानंतर मनोज जरांगेंनी हे आरोप माझ्यासाठी शॉकिंग असल्याचं म्हटलं आहे. हे आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलेत यावर विश्वासच बसत नाही असंही मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले.

गुप्त बैठकांच्या चर्चांवर मनोज जरांगेंचं मोठं विधान, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

पंकजा मुंडेंबाबत काय म्हणाले मनोज जरांगे?

मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडेंबाबत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही असं म्हटलं आहे. आरक्षणाला कोण विरोध करतं आहे हे सामान्य माणसांनी समजून घेणं आवश्यक आहे असंही मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले. पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले असून जरांगे यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार असा टोला लगावत कोणी काहीही बोलेल त्यावर मी प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या. विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर आज त्या बीडमध्ये आहेत. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केला आहे. मनोज जरांगेंनी सगेसोयऱ्यांसह आरक्षणाची मागणी केली आहे. त्यासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटमही संपला आहे. आता मनोज जरांगे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What manoj jarange said about prakash ambedkar allegations about him and devendra fadnavis scj