संजय राऊत यांनी मला खूप मदत केली आहे. त्यांनी मला अडचणींच्या काळातही मदत केली आहे आणि माझ्या आमदारकीच्या वेळीही मदत केली आहे. हा एक भाग झाला तसंच त्यांचं लिखाण हे देखील खूप उत्तम आहे. हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण ते जे काही बोलतात त्यावेळी त्यांना जे सांगितलं जातं तेच संजय राऊत बोलतात. ज्यांना आक्रमक बोलायचं नाही पण आक्रमक बोलणारा माणूस पाहिजे असं म्हणून ती संजय राऊत यांच्याकडे भूमिका आली. त्यामुळे संजय राऊत यांना खूप त्रास झाला. या सगळ्यात संजय राऊत यांचा काही प्रमाणात बळी गेला असं मला वाटतं असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्ष जे सांगतो तेच संजय राऊत बोलतात

शेवटी प्रत्येक प्रवक्त्याचं काय कौशल्य आहे हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. पक्षाने सांगितलेली गोष्ट कशी बोलायची हे प्रत्येक जण ठरवू शकतो. संजय राऊत आक्रमक भाषा वापरतात. मात्र संजय राऊत जे काही बोलतात ते पक्ष सांगेल तेच बोलतात असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांचा बळी कसा गेला? असं विचारलं असता नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “संजय राऊत यांना अटक झाली होती. त्यांना धमक्या येत आहेत, त्रास होतो आहे. एवढं आक्रमक ते का बोलतात ते काही समजायला मार्ग नाही. पण एकमेकांना नावं द्यायची, वैचारिक न बोलता आक्रमक बोलायचं याला काही अर्थ नाही. नाट्यमय सगळं केल्याने तेढ वाढते” असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? नीलम गोऱ्हे स्पष्टच म्हणाल्या, “एकनाथ शिंदे गुवाहाटीवरून…”

कुणाला बरोबर ठेवायचं तो अधिकार उद्धव ठाकरेंचा

उद्धव ठाकरेंभोवती कडं आहे का काही ठरविक लोकांचं? याबाबत नीलम गोऱ्हे म्हणाल्या की उद्धव ठाकरेंना जे हवे आहेत तेच लोक त्यांच्या बरोबर आहे. कुणाला बरोबर ठेवायचं तो अधिकार उद्धव ठाकरेंचा आहे. त्यांना कुणीही सल्ले देत नाही. पक्ष म्हणून जी काही सपोर्ट सिस्टिम लागते ती नाही. मला वेळ देत नव्हते अशातला भाग नाही पण ते कुणालाच वेळ देत नव्हते असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. मी पक्ष सोडणार असं उद्धव ठाकरेंना कळवलं होतं. त्यावर नमस्कार आणि एक स्मायली पाठवली त्यांनी. त्यांना हे वाटत होतं की मी सोडून जाईन त्यामुळे मी जायच्या आधी त्यांचे फोन येत होते. त्यावर ते काही चर्चा करायचे त्यावर आम्ही छान आहे, बरोबर आहे असंच सांगायचो असं मिश्कील उत्तर नीलम गोऱ्हे यांनी दिलं आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What neelam gorhe said about thackeray group mp sanjay raut scj
Show comments