उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाची बदनामी कशी करायची हे संजय राऊत यांना माहित आहे. तेजस ठाकरेंचा जो व्हिडीओ बाहेर आला तो संजय राऊत यांच्यामुळेच असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. एवढंच नाही तर आधी बाळासाहेब ठाकरेंचं घर संजय राऊत यांनी फोडलं आता पवार कुटुंबात ढवळाढवळ करत आहेत असाही आरोप नितेश राणेंनी केला आहे. दसंच तेजस ठाकरेंच्या वादग्रस्त व्हिडीओवरही नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हटलं आहे नितेश राणेंनी?
“महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचं काम संजय राऊत यांच्याकडून सुरु आहे. सामनातून पगार घ्यायचा आणि बोनसचा चेक शरद पवारांकडून घ्यायचा. शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संजय राऊत यांना चिंता वाटू लागली की मी आता कुणाच्या बंगल्याबाहेर वॉचमनच्या शेजारी बसू?” असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.
संजय राऊत हा अत्यंत घाणेरडा माणूस, आगलाव्या माणूस आहे. संजय राऊत यांनी मुद्दाम रेडिओ बारचा विषय काढला. मोहित कंबोज यांना डिवचलं त्यामुळेच मोहित कंबोज यांनी तेसज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला. या व्हिडीओत तेसज ठाकरे दारु पिताना आणि मैत्रिणींसोबत पार्टी करतानाचा हा व्हिडीओ आहे.
मोहित कंबोज यांच्याकडे माझी तक्रार आहे
मोहित कंबोज यांच्याकडे मला एक तक्रार करायची आहे. काल त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद बरोबर होती. पण एक मला चूक वाटली. त्यांनी तेजस ठाकरेंचं एक बिल दाखवलं. ९७ हजार की एक लाख असं काहीतरी आहे. त्या बिलावर लिहिलं आहे की हे बिल पेड केलं आहे त्यात मला तथ्य वाटत नाही. कारण हे कुणीही बिल भरत नाहीत. फुकट खातात, फुकट शॉपिंग करतात असाही आरोप नितेश राणे यांनी केला आहे. हॉटेलचं बिल आणि ठाकरे बंधू यांचं काहीही समीकरण नाही. हे लोक कधीही बिल भारत नाही असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. जे घाणेरडं राजकारण संजय राऊत करत आहेत असाही आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
काय आहे त्या व्हिडीओत?
या व्हिडीओत तेजस ठाकरे हे त्यांच्या मित्र मैत्रिणींसोबत ड्रींक्स करत असल्याचं दिसतं आहे. या हॉटेलचं बिलही ट्वीट करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ कोव्हिड काळातला आहे असाही दावा करण्यात आला आहे.