Ashok Chavan Latest Updates : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. काँग्रेसमधील सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आज भारतीय जनता पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व अशोक चव्हाणांनी स्वीकारलं. दरम्यान, काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते भाजपात आल्याने त्यांना आता कोणतं पद मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज आमच्या सर्वांकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील एक अतिशय ज्येष्ठ नेतृत्त्व, अनेक वर्ष महाराष्ट्र विधानसभा, देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली, विविध मंत्रिपदे ज्यांनी भुषविली आणि दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकिर्द आपल्याला पाहायला मिळाली, असे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती करतो की त्यांनी अशोक चव्हाणांच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मवर सही करून पक्षात रितसर प्रवेश द्यावा.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

हेही वाचा >> भाजपाच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अशोक चव्हाण म्हणाले “मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष”; फडणवीसांनी चूक लक्षात आणून देताच…

“सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षामध्ये अशोक चव्हाण, अमर राजूरकर यांचं स्वागत करतो. निश्चितच त्यांच्यासारख्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात भाजपाची आणि महायुतीची शक्ती भक्कम झाली आहे, याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही. आज आपण पाहतोय की देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्णत्त्वाकडे नेण्याचं काम केलं, जो बदल आणि परिवर्तन भारतात दिसायला लागला, त्यामुळे देशभरातील अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशातील मुख्य प्रवाहातील लोकांबरोबर काम करावं, मोदींसारख्या नेतृत्त्वाखाली काम करावं, देशाला पुढे नेण्याच्या मोदींच्या प्रयत्नांत आपणही वाटा उचलावा अशा प्रकारचा विचार अनेकांमध्ये आला. त्यामुळे प्रमुख नेतृत्त्व म्हणून आपण अशोक चव्हाणांकडे पाहू शकतो. अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी एवढंच सांगितलं आहे की विकासाच्या मुख्यधारेत योगदान देण्याची संधी द्या, मला पदाची कोणतीही लालसा नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >> अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, देवेंद्र फडणवीस म्हणाले; “आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस कारण..”

अशोक चव्हाणांकडे कोणती जबाबदारी देणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अशोक चव्हाण दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले होते. त्यामुळे त्यांची काय जबाबदारी असणार हे केंद्रीय पातळीवर ठरवलं जाणार आहे. कारण अशोक चव्हाणांचं भाजपात येणं हे महाराष्ट्राच्या मजबुतीसाठी फायदेशीर आहेच, पण त्यांच्याबाबतचा निर्णय केंद्रीय भाजपाकडूनच घेतला जाईल.”

Story img Loader