राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या अनुषंगाने राजकीय खेळी केल्या जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी कोणता कानमंत्र दिला आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, “तुम्ही अजून शरद पवारांना ओळखलंच नाही. ते रेडिमेड काहीच सांगत नाहीत. तुम्ही एखादी भूमिका घेत असाल आणि ती योग्य असेल, तर त्याबद्दल शरद पवार काहीच बोलत नाहीत. पण तुमची भूमिका चुकली, तर ते तुमचे कान धरतात. अजूनपर्यंत त्यांनी माझे एकदाही कान धरले नाहीत.”

हेही वाचा- मनातील मुख्यमंत्री कोण? अजित पवार, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी घेतलं एकाच नेत्याचं नाव, म्हणाले…

२०१९ मध्ये पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनी सर्व आमदार परत आणले होते. आता २०१९ च्या तुलनेत शरद पवारांचा दरारा कमी झाला आहे का? असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, “सर्व आमदारांनी परत यावं, यासाठी शरद पवारांनी प्रयत्न कुठे केले? त्यांनी अजिबात प्रयत्न केले नाहीत. शरद पवारांचा आजही किती दरारा आहे? हे सामान्य लोकांना नक्कीच माहीत आहे. त्याचबरोबर पलीकडे जे नेते गेले आहेत, ते सुरुवातीपासून शरद पवारांना दैवत म्हणत आहेत. त्यांचे फोटो वापरत आहेत. त्यामुळे त्यांनाही माहीत आहे, शरद पवारांची ताकद किती आहे. अशा परिस्थिती मध्ये दरारा कमी होत नसतो.”

हेही वाचा- भाजपाबरोबर जाण्याआधी अजित पवारांनी ऑफर दिली? रोहित पवारांचं थेट भाष्य, म्हणाले…

“२०२४ ला शरद पवार अशी एक गोष्ट करतील, ते विचारांना कुठेही दगा देणार नाहीत. पण लोकांच्या हिंमतीवर ते विरोधकांना असं उत्तर देतील की तो एक मोठा इतिहास असेल. हे मी १०० टक्के खात्रीने सांगतो. कारण शरद पवार कुणाला घाबरत नाहीत. ते लोकांवर विश्वास ठेवून राजकारण करतात”, असंही रोहित पवार पुढे म्हणाले. ते ‘मुंबई तक’ला दिलेल्या भाषणात बोलत होते.