इंदापूर: इंदापूर तालुक्यामध्ये यावर्षी रब्बी हंगामासाठी २७ हजार  दोनशे हेक्टर क्षेत्रामध्ये विविध धान्याचा पेरा झाला असून अन्य  पीकांसह गव्हाच्या पिकाची परिस्थिती उत्तम असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्री. रुपनवर यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंदापूर तालुक्यातील २७ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १४ हजार हेक्टर क्षेत्रावर ते मका, अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर गहू व अन्य इतर गळीत धान्य व तृणधान्य असा पेरा रब्बी हंगामामध्ये इंदापूर तालुक्यात होतो.इंदापूर तालुका हा रब्बी हंगामाचाच तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, अलीकडच्या काळामध्ये पारंपारिक ज्वारीचे पिकाचे क्षेत्र घटले असून गव्हाचे क्षेत्र वाढण्याऐवजी मक्याच्या पिकाला शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिली असल्याची माहिती श्री .रुपनवर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितली.

यावर्षी तालुक्यात रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पेरा केलेल्या गव्हाच्या पिकाची परिस्थिती सध्या हे पीक हुरड्यात असून चांगले उत्पादन निघण्याचे अपेक्षा कृषी विभागासह शेतकऱ्यांनी ही व्यक्त केली आहे.पारंपारिक ज्वारीचे क्षेत्र घटल्यामुळे इंदापूर हा एकेकाळी ज्वारीचे आगार म्हणून ओळखल्या जाणारा तालुक्याची ओळख आता पुसली जात आहे.विविध पिकांची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येतोय .डाळिंब, द्राक्ष ,केळी ,पपई आदी फळबागांसह सर्वच पिकांना इंदापूर तालुक्यामध्ये अनुकूल आणि पोषक वातावरण असल्यामुळे शेतकरी विविध पिके घेऊ लागलेले आहेत.यावर्षी गव्हाच्या पिकाचा पेरा ही समाधानकारक असून मागील काळात गहू पिकास पोषक वातावरण निर्माण झाल्याने गव्हाचे पीक जोमदार आले आहे.