आषाढी एकादशी यंदा कधी साजरी करायची..८ जुलै की ९ जुलैला? हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे विविध पंचांगांमधील तफावत. महाराष्ट्रातील पंचांगांनुसार आषाढी एकादशी ९ जुलै रोजी आहे, तर देशातील इतर पंचांगांनी ती ८ जुलै रोजी येत असल्याचे दाखवले आहे. पंचांगांमधील ही तफावत ती वापरत असलेल्या वेगवेगळ्या आधारांमुळे आली असून, दोन्ही बाजू आपापल्या आधारावर ठाम आहेत.
महाराष्ट्रातील बहुतांश प्रमुख पंचांगे दृकसिद्धांतावर आधारित आहेत. ती ‘ग्रीनवीच मीन टाईम’ (जीएमटी) म्हणजेच आताची ‘युनिव्हर्सल टाईम कॉर्डिनेटेड’ (यूटीसी) या वेळेचा आधार घेतात. त्यात भारतीय प्रमाण वेळेचा फरक गृहीत धरून त्या आधारावर ही पंचांगे तयार केली जातात. मात्र, देशाच्या इतर भागात वापरली जाणारी पंचांगे सूर्यसिद्धांत हा आधार मानतात. त्यात भारताच्या मधोमध मानल्या जाणाऱ्या उज्जन या केंद्रावरून जाणारी रेषा आधारभूत मानून पंचांगे तयार केली जातात. पंचांग बनवण्याची ही पद्धत प्राचीन काळापासून रूढ आहे. आर्यभट्ट, लल्लाचार्य, भास्कराचार्य अशा प्राचीन अभ्यासकांनी याच रेषेचा आधार घेऊन गणिते मांडल्याचे सांगितले जाते. या रेषेचा आधार घेऊन तयार केलेल्या पंचांगांमध्ये काशी येथील दमनमोहन मालवीय पुरस्कृत विश्व पंचांग, गणेश आपा पंचांग, हृषीकेश पंचांग, अन्नपूर्णा पंचांग, मध्वाचार्य पंचांग, शृंगेरी शंकराचार्याच्या पीठाचे पंचांग, धारवाड पंचांग अशा अनेक पंचांगांचा समावेश होतो. या दोन्ही पंचांगांचा आधारच वेगळा असल्याने त्यांच्या तिथींमध्येही थोडा फार फरक असतो. काही वेळा हा फरक साडेचार ते पाच तासांपर्यंतही वाढतो. अशा वेळी या दोन पंचांगांमध्ये एकच तिथी वेगवेगळ्या दिवशी येऊ शकते. या आषाढी एकादशीला हे घडणार आहे.
आषाढी एकादशी नेमकी कधी?
आषाढी एकादशी यंदा कधी साजरी करायची..८ जुलै की ९ जुलैला? हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे विविध पंचांगांमधील तफावत. महाराष्ट्रातील पंचांगांनुसार आषाढी एकादशी ९ जुलै रोजी आहे,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-06-2014 at 02:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When exactly ashadhi ekadashi