मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं असलं तरी राजकीय पेचामुळे अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दोघेच महाराष्ट्राचा कारभार चालवत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवली असताना शिंदे आणि फडणवीस हे दिल्ली दौरा करत आहेत, अशी टीकाही विरोधीपक्षाकडून केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सूचक विधान केलं आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्यानंतर ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

“हे सरकार लवकरच पडेल” या विरोधकांच्या आरोपाबाबत विचारलं असता, उदयनराजे म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकारला दृष्ट लागू नये म्हणून ते बोलतात. पण हे सरकार पडणार नाही. त्यामुळे काहीही काळजी करू नये.”

हेही वाचा- “शाहांसोबतच्या बैठकीत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं ठरलं पण उद्धव ठाकरेंनी…”; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल माजी आमदाराचा खुलासा

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे, असं असताना राज्यात दोघंच सरकार चालवतात, याबाबत काय सांगाल? असं विचारलं असता उदयनराजे यांनी मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. ते म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. पण निश्चितपणे येत्या ३ ते ४ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. सध्या राष्ट्रपतीची निवडणूक झाली आहे, सोमवारी त्यांचा शपथविधी होणार आहे. मूर्मू यांचा शपथविधी झाल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.”