Ladki Bahin Yojana Update: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे सरकारी कामांवर अंकुश लागतो. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते. आता ही योजना बंद होण्याची चर्चा सुरू झाली असताना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी थेट डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबविण्याचे निर्देश दिल्यानंतर काल ही योजना बंद होणार असल्याची अफवा उठली होती. त्यानंतर सरकारकडून लागलीच त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले.

sawantwadi tree cut
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील वृक्षतोड रोखण्यासाठी ‘टास्क फोर्स’ समिती स्थापन
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार? या प्रश्नावर शरद पवार स्पष्टच बोलले…
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana Diwali Bonus
Ladki Bahin Yojana Diwali Bonus : लाडक्या बहिणींना खरंच अडीच हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार? नेमका शासन निर्णय काय?
Jammu & Kashmir Election Results 2024
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 : जम्मू-काश्मीरची सत्ता मिळवली, कलम ३७० बाबत आता कोणती भूमिका? ओमर अब्दुल्ला म्हणाले…
Sarpanch Upasarpanch Salary
Sarpanch Salary Hike : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Date Out
Majhi Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार तिसरा हप्ता

हे वाचा >> Ladki Bahin Yojana : निवडणूक आयोगाचे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारला महत्त्वाचे निर्देश!

अदिती तटकरे यांनी १९ ऑक्टोबर रोजी रात्री एक्सवर पोस्ट करून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार” असे स्पष्टपणे म्हटले आहे. त्या पुढे म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे.”

सहावा हप्त डिसेंबर महिन्यात मिळणार

“सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती”, असेही अदिती तटकरे पुढे म्हणाल्या.

दरम्यान राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अदिती तटकरेंची पोस्ट शेअर करत या योजनेबद्दल मोठे विधान केले. राज्यातील महिलांनी भूलथापांना बळी पडू नये, असे ते म्हणाले. “या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्यानं अतिशय जबाबदारीनं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माझ्या भगिनींना, मायमाऊलींना विनंती आहे की, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये”, अशी पोस्ट अजित पवार यांनी एक्सवर केली आहे.

हे ही वाचा >> Ajit Pawar : “तुम्ही बांधलेल्या प्रत्येक राखीची शपथ घेऊन सांगतो की…”; अजित पवारांचं लाडक्या बहिणींसाठी खास आवाहन!

२ कोटींहून अधिक महिला पात्र

महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तर आतापर्यंत राज्यात २ कोटी २६ लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. जुलै महिन्यापासून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने राबवली आहे. आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमाही झाले आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दिल्यानंतर सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र खात्यात जमा केले.