राज्यात उद्यापासून (१७ जुलै) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पावसाळी अधिवेशाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार घातला. प्रथेनुसार विरोधकांनी सरकारला पत्र पाठवले आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. विरोधकांचं अवसान गळाल्याचं ते म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातला आहे. परंतु, विरोधी पक्ष एकजुटीने राज्याच्या प्रश्नांना वाचा कशी फोडतील याबाबत उहापोह असतो. परंतु, त्यांनी जे पत्र पाठवलं ते अंतिम आठवडा पत्रासारखं पाठवलं आहे. विरोधी पक्ष गोंधळेलेला दिसतोय. आत्मविश्वास गमावलेला विरोधी पक्ष आहे. अवसान गळाल्यानंतर काय होतं, याचं चित्र निर्माण झालं आहे”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

हेही वाचा >> पावसाळी अधिवेशनासाठी सत्ताधारी सज्ज, ट्रिपल इंजिन सरकारकडून ‘चहापाना’चा आस्वाद

मी कोणाला कमी लेखत नाही

ते पुढे म्हणाले की, “मी काही कोणाला कमी लेखत नाही. आमच्या कामाचा उरक आणि गती पाहून अजित दादांनी आम्हाला पाठिंबा दिल्यापासून तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेवटी संख्याबळालाही महत्त्व असतं. आज २१० पेक्षा जास्त आमदार सरकारच्या पाठीशी आहेत. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु, विरोधी पक्षाचा जो अधिकार आहे, राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेच्या अधिवेशात वाचा फोडली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, विविध आयुधं वापरली पाहिजेत. हे सर्व विरोधी पक्षाकडून अपेक्षित असतं. पण आज दुर्दैवाने तसं होताना दिसलं नाही”, असंही शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> VIDEO : “विरोधी पक्षाला विषयच माहिती नाही, त्यामुळे…”, ‘त्या’ प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांची टीका

पण विरोधी पक्ष आहे कुठे?

“सभागृहात जे जे प्रश्न उपस्थित करतील, लक्षवेधी येतील, लोकांचे प्रश्न उपस्थित होतील, त्यांना न्याय देण्याचं काम करू. राज्यातील जनतेचं लक्ष अधिवेशनाकडे असतं. विरोधी पक्षाचं काम असतं की सरकार जिथं चांगलं काम करतंय तिथे चांगलं म्हणणं. विरोधी पक्षनेता आम्ही तिघेही होतो. आमच्याकडे सर्व अनुभवी लोक आहेत. आम्ही विरोधाला विरोध केला नाही. बाळासाहेबांनी काय शिकवलं, चांगल्याला चांगलं म्हणा. तसं काम आम्ही केलं. केवळ विरोधाला विरोध न करता, चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती असली पाहिजे. जिथे सरकार चुकतंय तिथे नक्की जाब विचारण्याची जबाबदारी विरोधी पक्षाकडे असते. पण सध्या विरोधी पक्ष कुठे आहे ते शोधावं लागेल. जे जे प्रश्न येतील, जे काही आयुधांच्या माध्यमातून विचारलं जाईल, त्याला योग्य पद्धतीने न्याय देण्यात येईल”, असं अजित पवार म्हणाले.

“अजित पवार लवकर पहाटे काम करतात, मी उशीरापर्यंत काम करतो. आणि देवेंद्र फडणवीस तर ऑल राऊंडर आहेत. बॉलिंग पण करतात, विकेटपण घेतात, चौकार षटकारही लावतात”, असा मिश्किल संवादही त्यांनी यावेळी साधला.