राम मंदिर उद्घाटन सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील हजारो प्रतिष्ठित नागरिकांना या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. परंतु, महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलेलं नाही. यावरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. परंतु, यावरून ठाकरे गटाची अधिकृत भूमिका समोर आली नव्हती. तसंच, गिरीश महाजन यांनीही राम मंदिराच्या उभारणीत ठाकरे गटाचं योगदान काय असा सवाल विचारला. तर, उद्धव ठाकरे हे सरकारच्या व्हीव्हीआयपी यादीत नसल्याने त्यांना आमंत्रण मिळालं नसेल असंही म्हणाले. यावरून ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

“आम्हाला निमंत्रण येवो अथवा न येवो, तो आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. इव्हेंट करणारी जी लोक आहेत, त्यांनी त्या काळात पळपुटेपणा केला. ज्यांना लालकृष्ण अडवाणींची आठवण होत नाही, विश्वहिंदू परिषदेचा उल्लेख होत नाही. अशा लोकांकडून आम्ही काय अपेक्षा करायची? असं सचिन अहिर म्हणाले.

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”

“राम मंदिर त्यांनी घडवलेलं नाही. राजकीय पक्ष म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी परखड भूमिका मांडली होती. या विषयाला चालना देऊन सांगितलं होतं की लोकसभेत हे बिल आणा. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर हा तिढा सुटलेला आहे. परंतु, आता इव्हेंट करत आहेत, जसं काय यांनीच तिथे जाऊन विटा लावल्या आहेत. आम्हाला अभिमान आहे की राम मंदिर उभं राहतंय. मात्र, आम्हाला आमंत्रण मिळो अथवा न मिळो आम्ही गतवर्षीप्रमाणे तिथे नतमस्तक व्हायला अगोदर जायचो तसं भविष्यात जाणार आहोत”, असं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा >> राम मंदिर उभारणीत उद्धव ठाकरेंचे योगदान काय ? – गिरीश महाजन

राम मंदिर उभं राहणं देशाचा स्वाभिमान

“जे सांगत आहेत की आम्ही छातीवर बसून राम मंदिर बांधलं आहे, त्यांची ५६ इंची छाती त्यावेळी (बाबरी मशीद पाडताना) कुठे होती? जर बाबरी मशीदीवर हल्ला झाला असेल आणि तो माझ्या लोकांनी केला असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. हे सांगण्याचं धाडस आहे का कोणत्या पक्षात? राम मंदिर उभं राहणं हा देशाचा स्वाभिमान आहे. देशाची आस्था आहे. या आस्थेला राजकीय वळण देण्याचं काम होतंय. सातत्याने आमचं खच्चीकरण करण्याचा केविलवाणा प्रयत्न होतोय हे जनतेला माहितेय”, असंही सचिन अहिर म्हणाले.

राम मंदिराच्या निर्माणाकरता आमचं योगदान

“राजकीय पक्ष म्हणून सर्वांत पहिली एक कोटींची देणगी शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी दिली होती. त्याची किंमत आज किती येईल हे सांगता येणार नाही. परंतु, राम मंदिराच्या निर्माणाकरताही आमचं मोठा योगदान होतं”, असंही अहिर यांनी स्पष्ट केलं. विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांकडून सल्ला घ्यायचे. आज आम्हाला डावललण्याचा प्रयत्न करत असतील तर ठीक आहे, असं ते म्हणाले.