नागपूर: सराटी या गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. आंदोलनामुळे शनिवारी राज्यातील एसटीचे ४५ आगार पूर्णत: बंद होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
एसटी महामंडळाचे राज्यात २५० आगार आहेत. त्यापैकी ४५ आगार शनिवारी बंद होते. या आंदोलामुळे आतापर्यंत एसटीच्या २० बसेस जाळण्यात आल्या. दरम्यान, आंदोलनाची सर्वाधिक झळ बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांना बसली. येथील एसटीचे सर्वच आगार बंद होते. उर्वरित महाराष्ट्रात वाहतूक सुरळीत असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली गेली.
First published on: 02-09-2023 at 19:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which district suffered the most from the maratha movement mnb 82 amy