Sharad Pawar Favorite Chess Piece : भारतीय राजकारणातील तैल लावलेला पैलवान अशी शरद पवार यांची ओळख आहे. ते आपल्या राजकीय खेळीने भल्याभल्यांना हैराण करुन सोडतात. महत्त्वाचे म्हणजे ते राजकारणी आहेतच, शिवाय ते उत्तम बुद्धीबळपटूदेखील आहेत. दरम्यान, आता बुद्धीबळाच्या पटावरील त्यांचा आवडता सैनिक कोणता? याबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार यांनी आज ‘एबीपी माझा’ या वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. याबरोबरच त्यांनी अनेक किस्से सांगत जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. यादरम्यान बुद्धीबळाचा वापर राजकारणात होतो का? आणि बुद्धीबळाच्या पटावरील आवडता सैनिक कोणता? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याबाबत बोलताना बुद्धीबळाचा वापर राजकारणात नक्कीच होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “…तर लोकसभेसारखी स्थिती दिसू शकेल”, विधानसभेसाठी शरद पवारांनी मांडलं राजकीय गणित; म्हणाले, “आजच्या राज्यकर्त्यांना…”

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

अनेक जण म्हणतात की बुद्धीबळ चांगला खेळतो. मात्र, असं काही नाही. गंमतीने कधी वेळ मिळाला तर खेळायला बसतो. याच्यात दोन तीन गोष्टी असतात, उंट तिरकाच चालतो, राजकारणा उंट कोण हे लक्षात ठेवावं लागतं. घोडा अडीच घरं चालतो, तर अडीच घरं चालणारा घोडा आपल्या बाजुने कोण आहे? ते बघावं लागतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. पुढे बोलताना बुद्धीबळाच्या पटावरील आवडता सैनिक कोणता असं विचारलं असता, मला वजीर आवडतो, असं शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी शरद पवार यांना मुलीसाठी ( सुप्रिया सुळे) जावाई कसा शोधला? आणि एकंदरितच सुप्रिया सुळे यांच्या विवाहादरम्यान त्यांची भूमिका काय होती? असा प्रश्न विचारण्यात आला. यासंदर्भात बोलताना, सुप्रिया सुळे यांच्या लग्नासाठी बाळासाहेब ठाकरे असतील, किंवा माधव आपटे असतील, अशा जवळच्या मित्रांनी स्थळ सुचवलं होतं. त्यानंतर ते दोघे भटले आणि त्यांनी ठरवलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Sharad Pawar on Maratha Reservation: “…तेव्हा मला माझी चूक लक्षात आली”, शरद पवारांचं आरक्षणाच्या मुद्द्यावरील विधान चर्चेत; म्हणाले, “मी सगळी कामं बाजूला ठेवून…”

आरक्षणाच्या मुद्द्यावरही केलं भाष्य..

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी राजकीय विषयांवरही भाष्य केलं. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना, आरक्षणाच्या मुद्यावरून दुर्दैवाने आज राज्यात दोन वेगळे गट पडले आहेत. त्या गटांना कुणीतरी काहीतरी सांगितले आहे. आजच्या राज्यकर्त्यांनीही दोन वेगळ्या बाजू घेतल्या आहेत. राज्याकर्त्यांच्या एका वर्गाने ओबीसींची बाजू घेतली आहे, तर दुसऱ्या वर्गाने मराठा आंदोलकाची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही, आपण सामंजस्य कसं निर्माण करू शकू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी संवाद आवश्यक आहे, असं शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which is the favorite chess piece of sharad pawar camel horse elephant or wazir spb
Show comments