लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
अलिबाग- निर्यात बंदीवरून राज्यात वातावरण तापले असतांनाच रायगड जिल्ह्यातील भाजप नेते दिलीप भोईर यांनी ग्राहकांना दहा रुपये दराने कांदा वाटपाची योजना राबविली आहे. अलिबाग तालुक्यात प्रतीग्राहक पाच किलो या प्रमाणे त्यांनी सात टन कांद्याचे वितरण केले आहे.
अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेले कांदा पिकाचे नुकसान हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. यावरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. निर्यात बंदी मागे घ्यावी यासाठी आंदोलने सूरू झाली आहे, विरोधकांनी या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठींबा दर्शवला आहे. निर्यात बंदीचा निर्णय योग्य नसल्याची टीका त्यांनी केली आहे. दरम्यान कांद्यावरून राजकारण तापले असतांनाच रायगड जिल्ह्यातील भाजपचा नेत्याने ग्राहकांना स्वस्तात कांदे विकण्याचा उपक्रम राबविला आहे. दहा रुपये किलो दराने त्यांनी अलिबाग तालुक्यातील विविध गावांत कांद्याची विक्री केली आहे. ग्राहकांचाही या उपक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला आहे.
आणखी वाचा-“भाजपा आणि मिंधे सरकार देशातील लोकशाही मारायला…”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
दिलीप भोईर असे या भाजप नेत्याचे नावे असून, ते रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत. मध्यंतरीच्या काळात खुल्याबाजारात कांद्याचे दर ७० रुपयांपर्यंत पोहोचले होते. कांद्याचे हे चढे दर लक्षात घेऊन त्यांनी गावागावत स्वस्त कांदे विकण्याचा उपक्रम हाती घेतला. घाऊक बाजारातून कांद्याची उचल करून त्यांनी अलिबाग तालुक्यात स्वस्तात कांदे विक्री सुरू केली. अलिबाग तालुक्यातील रामराज, रेवस, वावे, झिराड, चोँढी या गावात प्रती ग्राहक पाच किलो या प्रमाणे कांद्याचे वितरण केले जात आहे. यासाठी प्रतिकीलो दहा रुपये असा दर आकारला जातो आहे. आत्ता पर्यंत एकूण सात टन कांद्यांची स्वस्तात विक्री करण्यात आली असून, या उपक्रमाला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद दिला आहे. स्वस्तात कांदे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असल्याचे या निमित्ताने पहायला मिळते आहे.