तपासकामी मदत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक शनिवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. अमित भागवत पांडे (वय ३४, चंदगड पोलीस ठाणे, मूळ रा. मु.पो.खोतवाडी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार व त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे प्रथम ५० हजार रुपये पांडे याने मागितले. तडजोडीअंती ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी पहिला हफ्ता २० हजार रुपये स्वीकारला असता पांडे त्या रंगेहात पकडण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी शनिवारी दिली.