अलिबाग – अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. भात कापणी झाल्यानंतर शेतात पांढरा कांदा लावला जातो. यंदा पाऊस उशिरापर्यंत पर्यंत पडला. त्यामुळे कांद्याची लागवड थोड्या उशिराने सुरू झाली. त्यामुळे यंदा अलिबागचा पांढरा कांदा बाजारात उशिरा होणार आहे. .
औषधी गुणधर्म, रूचकर, कमी तिखटपणा अशी विविध वैशिष्ट्ये असलेला अलिबागच्या पांढर्या कांद्याला मागणी वाढत आहे. चांगला दर मिळत असल्यामुळे उत्पन्न देखील चांगले मिळते. त्यामुळे अलिबाग परिसरातील शेतकरी आता पांढर्या कांद्याच्या उत्पन्नाकडे वळू लागला आहे. आता आलिबाग तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले आहेत.
हेही वाचा >>> मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा; भाजपा धक्कातंत्र अवलंबणार?
राज्यातील इतर कुठल्याही भागात पिकणाऱ्या पांढऱ्या कांद्यापेक्षा अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मागणी वाढू लागली आहे. या कांद्याचे वेगळे गुणधर्म असल्यामुळे अलिबागच्या पांढर्या कांद्याला केंद्र सरकाने भौगोलिक मानांकन (जीआय) देण्यात मान्यात दिली आहे. या कांद्याची आता वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
हेही वाचा >>> रायगडमध्ये ५४ उमेदवारांची अनामत जप्त; मनसे, बसपा.वंचित सह अपक्ष उमेदवारांचा समावेश
अलिबाग तालुक्यातील अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पांढरा कांद्याची शेती केली जाते. साधारण पाच हजार टन उत्पादन दरवर्षी काढले जाते. अलिबाग तालुक्यातील कार्ले, रुळे, निगडे, वाडगाव, नेहुली, सागाव, खंडाळे, तळवली इत्यादी गावांमध्ये या कांद्याची पारंपारिक पद्धतीने लागवड केली जाते. भात कापणी झाल्यावर शेतात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. जमिनीतील ओलावा कांद्याला पुरेसा असतो. यंदा पाऊस उशिरा पर्यंत पडला. शेतात पाणी असल्यामुळे भात कापणी उशिरा झाली. त्यामुळे कांदा लागवाडीला देखील उशीर झाला. त्यामुळे यंदा पांढरा कांदा बाजारात थोडा उशीरच येणार आहे. “ पाऊस लांबल्यामुळे कांदा लागवडीस थोड्या उशिराने सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा अलिबागच्या पांढरा कांदा बाजारात येण्यासाठी थोडा उशीर होईल. पांढरा कांदा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला बाजारात येईल. ” सतीश म्हात्रे , कांदा उत्पादक शेतकरी