महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. जेव्हा ते एखाद्या प्रकणावर प्रतिक्रिया देतात तेव्हा ती प्रतिक्रिया खास शालजोडीतला टोलाच असतो. सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) चर्चेत आहेत. याची दोन कारणं आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर श्याम मानव, अनिल देशमुख यांनी आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप होतो आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) कधीच नव्हते असं म्हटलं आहे. या सगळ्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. तसंच शरद पवारांकडे आपल्या उत्तरातून अंगुलीनिर्देश केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत संजय राऊत काय म्हणाले?

अमित शाह यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाहीत, कधीच नव्हते. हे सगळ्यांना माहीत आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळालं कारण त्यांनी शिवसेना फोडायला मदत केली. त्यांच्यात काही फार कर्तृत्त्व, कर्तबागारी काही नाही, अनुभवही नाही. दिल्लीला पैशांच्या थैल्या द्यायच्या आणि महाराष्ट्राची अवस्था त्यांनी दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसण्यासारखी केली आहे. गुजरात व्यापार मंडळाला बिनकण्याचा मुख्यमंत्री हवा असतो त्यापद्धतीने हे काम करत आहेत. दुसरं काय?” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : “अनिल देशमुखांच्या रेकॉर्डिंग माझ्या हाती, त्यांनी..”, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

श्याम मानव आणि अनिल देशमुख यांना देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर

तर दुसरीकडे श्याम मानव आणि अनिल देशमुख यांनीही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळात दबाव आणल्याचा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांना चार प्रतिज्ञापत्रं देण्यात आली होती. त्यावर तुम्ही गृहमंत्री म्हणून सही करा तसं झालं तर ईडीचा ससेमिरा मागे लागणार नाही, तुम्ही तुरुंगात जाणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं असा आरोप अनिल देशमुख यांनी केला. याच प्रकारचा दावा सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी केला. या सगळ्यावर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी आपल्याकडे अनिल देशमुखांविरोधात पुरावे आहेत, मी त्याशिवाय काहीही बोलत नसतो असं म्हटलं आहे. तसंच सतत जे टार्गेट केलं जातं आहे त्यामुळे कुणाला फायदा होतो? कुणाला मी घातक वाटतो असे प्रश्न विचारत थेट शरद पवारांकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे. तसंच त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांकडे अंगुलीनिर्देश?

“सातत्याने या देवेंद्र फडणवीसला टार्गेट केल्याने कुणाला फायदा होईल हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. देवेंद्र फडणवीसला टार्गेट केल्याने कुणाला फायदा होतो? टार्गेट एकच देवेंद्र फडणवीस. ही जी काही लोकांची शक्ती आहे, प्रेम आहे हे कुणाला समजतं? ते कुणाला घातक वाटतं? देवेंद्र फडणवीसमुळे कुणाला धोका आहे? हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. इको सिस्टीम कोण चालवतं आहे, हेदेखील आपल्याला माहीत आहे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.