बीडमधील केज तालुक्याच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या गोरख धंद्याला चाप बसवावा या मागणीसाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधत असताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. तसेच परळीत राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले असल्याचे सांगून परळी पॅटर्नचाही उल्लेख सुरेश धस यांनी केला. यावेळी त्यांनी सपना चौधरी, प्राजक्ता माळी आणि रश्मिका मंदाना यांचा उल्लेख केला. सुरेश धस यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.
“गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे आमदार धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न बीडमधील राजकीय लोक करत आहेत. अमोल दुबेप्रकरणात तोंडघशी पडलेले सुरेश धस महायुतीचे आमदार आहेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्याचा पोटशुळ त्यांना सुटला आहे. आमचं म्हणणं आहे की मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निंदनीय आहे. त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही. त्याला फासावर लटकवलं गेलं पाहिजे. या भूमिकेचं आम्ही स्वागत केलं आहे. पण सुरेश धस यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही या आसुयेपोटी ते राजकारण करत आहेत. त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना हे शोभत नाही. महायुतीचे ते घटक आहेत. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते पुढे आले आहेत. संजय राऊतांना पुढे आणलं गेलंय”, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.
हेही वाचा >> Suresh Dhas: “प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका
हमाम में सब….
u
“जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची जबाबदारी सुरेश धस यांना कोणी दिली आणि त्यांनी का घेतली हे समोर आलं पाहिजे. मस्साजोगप्रकरणी लक्षविचलीत करायला आणि त्यामागचे काळे कारनामे करायला सर्वांनी एकत्र राजकारण करायला सुरुवात केली आहे का हे तपासलं पाहिजे. हमाम में सब नगें होते है सुरेश साहेब. त्यामुळे त्या कुटुंबाला न्याय देण्यापेक्षा तुम्ही स्वार्थी राजकारण करत आहात, बीडच्या जनतेला आणि महाराष्ट्राला हे कळून चुकलंय”, असंही अमोल मिटकरी म्हणाले.