Who is Gajabhau : भारतीय जनता पक्षाचे सदस्य मोहिम कंबोज यांनी एका एक्स युजरला जाहीर धमकी दिली आहे. माझं पुढील टार्गेट गजाभाऊ… पृथ्वीवर कुठेही असलास तरी तिथून तुला उचलणार”, असं मोहित कंबोज म्हणालेत. त्यांच्या या जाहीर धमकीनंतर त्यांच्यावर टीकेचा मारा झाला. महायुतीच्या समर्थकांनी मोहित कंबोज यांचं समर्थन केलं तर महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली.
गजाभाऊ कोण?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गजाभाऊ हे एक्स हँडल तुफान चर्चेत आहे. तसंच भाजपा आणि महायुतीमधील पक्षांवर टीका करत या अकाऊंटवरुन अनेक पोस्ट शेअर केल्या जातात. “जन्माने बॉक्सर, मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर, यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य भाऊ गँग” असं या हँडलवरील बायोमध्ये लिहिलं असून, हे हँडल व्हेरीफाईड हँडल आहे. या अकाऊंटवरून केलेल्या पोस्टवरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत.
90 Days !!
— गजाभाऊ (@gajabhauX) November 24, 2024
आज ही शेवटची पोस्ट या विषयावर मला नाही वाटत की देवेंद्र आता या विषयावर माफी मागतील. जे गुन्हेगार होते त्यांना दुसऱ्या दिवशी जामीन झालेला आहे. ही घटना होऊन फक्त तीन महिने झाले आणि लोक विसरून गेले
हा मुद्दा मला फार महत्त्वाचा होता
पण
ना विरोधकांना तो महत्वाचा होता… pic.twitter.com/g8brboB37e
मोहित कंबोज हे भाजप समर्थक असून, राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घडामोडींमध्ये त्यांचा सहभाग दिसून आला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावर त्यांनी केलेल्या आरोपांची मालिका सर्वांनी पाहिली होती. तसंच ते वारंवार भाजप आणि महायुतीवर टीका करणाऱ्यांना इशारा देताना दिसून आले आहेत. त्यामुळे आता त्यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर पुढे नेमंक काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
मोहित कंबोज यांनी धमकी दिल्यानंतर गजाभाऊ या एक्स खात्यावरून त्यांना प्रत्युत्तरासाठी अनेक पोस्ट्स पडल्या. यामध्ये काहींनी मोहित कंबोज यांना समर्थन केलं आहे तर महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, गजाभाऊ हे एक एक्स खातं आहे एवढंच आतापर्यंत समोर आलं आहे. हे एक्स खातं कोण सांभाळतं याबाबत माहिती समोर येऊ शकलेली नाही.