ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील खरा मुख्यमंत्री कोण आहे? असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. दरम्यान, त्यांनी मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवरूनही सरकारला खडेबोल सुनावले.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मागील दोन आठवड्यांपासून मी सतत मुंबई-नाशिक महामार्गाचा विषय लावून धरला आहे. सध्या काही मंत्री ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने प्रवास करत आहेत. मुंबई-नाशिक रस्ता खराब झाल्यामुळेच संबंधित मंत्री ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने प्रवास करत आहेत.”

maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Candidates say Raj Thackeray cheated citizens of Vaidarbh
उमेदवार म्हणतात राज ठाकरेंकडून वैदर्भियांची फसवणूक
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray says Obstruction of projects so people will not support him
“उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांची अडवणूक, जनता त्यांना थारा देणार नाही…” देवेंद्र फडणवीसांची टीका
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”

“मुंबई-गोवा या रस्त्याचंही गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. या रस्त्यावर अनेक खड्डे आहेत. या प्रश्नावरून अनेकजण आंदोलन करतायत. संसदेतही हा मुद्दा उचलून धरला जात आहे. पण सरकारमधील नेत्यांना फक्त पालकमंत्री कोण बनणार? यावरून भांडणं करायला वेळ आहे,” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

“हा महामार्ग नॅशनल हायवेज ऑथोरिटी ऑफ इंडियाकडे (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) म्हणजेच केंद्र सरकारच्या अधिकारांमध्ये येतो. त्यामुळे हा महामार्ग महाराष्ट्रातून जातो म्हणून एवढे खड्डे पाडून ठेवले आहेत का? म्हणून या रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाहीये का? असा प्रश्न पडतो. आपण ऐकतो की, एनएचएआय एका तासांत हजारो किलोमीटरचे रस्ते बनवतो. उद्या ते येथून चंद्रापर्यंत पण रस्ते बनवतील. पण आज त्यांनी महाराष्ट्राला चंद्राचे रस्ते दिले आहेत. यावर कुणीच बोलत नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्रावर अन्याय होत आहे”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.