धुळ्याच्या साक्री या दुष्काळी तालुक्यातील छडवेल-कोर्डे हे गाव अचानक महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गाजू लागले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या गावचे रहिवासी संदीप बेडसे यांच्यामुळे हे भाग्य नावाप्रमाणेच कायम ‘कोरडय़ा’ राहणाऱ्या या गावास मिळाले आहे. आधी सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून बेडसे कार्यरत होते. गेल्या काही वर्षांत या खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्कात ते आले आणि थेट त्यांचे ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ म्हणून रुजू झाले. मग अल्पावधीतच त्यांची लक्षणीय भरभराट झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी चिखलीकरशी बेडसेशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर तडकाफडकी त्यांची पुन्हा मूळ सेवेत म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागात बदली करण्यात आली आणि बेडसे हे नाव चर्चेत आले. वादग्रस्त बेडसे यांनी भुजबळ यांचे पुत्र पंकज यांना अवघ्या २२ दिवसांत नांदगाव मतदारसंघातून निवडून आणण्यात महत्त्वपूर्ण राजकीय भूमिका निभावल्याचे सांगितले जाते. मनमाड, नांदगाव या शहरांसह मतदारसंघातील ग्रामीण भागांची कोणतीही माहिती नसलेल्या पंकज भुजबळांचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट निश्चित झाल्यानंतर बेडसे यांनी प्रचारकार्याची महत्त्वपूर्ण धुरा सांभाळत नवख्या असलेल्या पंकज यांचा सर्व राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांशी अर्थपूर्ण परिचय करून देण्याचे काम केल्याची सूरस कथा सांगितली जाते. राजकारण करण्यात हातखंडा असलेल्या बेडसेंचा या काळात चांगलाच दबदबा निर्माण झाला. मतदारसंघातील प्रमुख वजनदार राजकीय नेते व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून, योग्य ती बातचित करून भुजबळांशी दिलजमाई करून देणे, विविध आश्वासने देऊन प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या गळाला लावण्यात बेडसेंचा हातखंडा होता, असे म्हटले जाते.
निवडणुकीच्या काळात बेडसेंचे मनमाड हेच मुख्यालय होते. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील मतदारांच्या याद्या करणे आणि शेवटपर्यंत मतांमध्ये कशी वाढ होईल, यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बेडसेंच्या नेतृत्वाखाली अर्थपूर्ण प्रभावी यंत्रणा उभारली गेली होती, असे राजकीय पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नांदगाव हा खरेतर काँग्रेसचा बालेकिल्ला. पण राष्ट्रवादीने ही जागा पंकज भुजबळांसाठी हिसकावून घेतल्याने संतप्त काँग्रेसजनांना शांत करण्यातही बेडसेंनी आपले कौशल्य पणाला लावले. त्यामुळेच पंकज भुजबळांच्या उमेदवारीनंतर प्रारंभी आकाशपाताळ एक करणाऱ्या काँग्रेसच्या माजी आमदारासह सर्वच नेत्यांनी अल्पावधीतच चुप्पी साधली. दुसरीकडे प्रभावी अशा विरोधी शिवसेनेच्या उमेदवाराचे खच्चीकरण करणे, शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांची मने वळविणे, आरपीआयचे काही गट व इतर पक्षांचे तसेच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील प्रतिनिधींच्या थेट भेटी घेऊन राष्ट्रवादीसाठी वातावरण निर्मितीचे काम केल्याचे कार्यकर्त्यांचेच म्हणणे आहे. या सर्वाचा परिणाम म्हणजे अवघ्या २२ दिवसांच्या प्रचारातून पंकज भुजबळ नवख्या नांदगाव मतदारसंघातून ९६ हजारांहून अधिक मते मिळवून विजयी झाले. त्यानंतरच्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, शिक्षण मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी निवडणुकांमध्येही बेडसेंचा शब्द कार्यकर्ते प्रमाण मानू लागले. यामुळेच चिखलीकर प्रकरणाच्या अनुषंगाने बेडसे यांचे नाव येताच नांदगाव मतदारसंघात त्यांनी बजावलेल्या कर्तबगारीच्या कथा सांगितल्या जाऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदखेडा मतदारसंघातून उमेदवारी करण्याच्या हालचालीही बेडसेने सुरू केल्याचे म्हटले जाते.
कोण आहे संदीप बेडसे?
धुळ्याच्या साक्री या दुष्काळी तालुक्यातील छडवेल-कोर्डे हे गाव अचानक महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गाजू लागले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या गावचे रहिवासी संदीप बेडसे यांच्यामुळे हे भाग्य नावाप्रमाणेच कायम ‘कोरडय़ा’ राहणाऱ्या या गावास मिळाले आहे. आधी सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून बेडसे कार्यरत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-05-2013 at 03:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is sandeep bedse