राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी जोर आला होता. मात्र, माध्यमांसमोर येत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. मी पक्षातून बाहेर जाणार नसून जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. परंतु, त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही अजित पवारांच्या भूमिकेवर अनेकांकडून संशय व्यक्त करण्यात येतोय. तसंच, त्यांनी आपली बाजू मांडावी असं संजय राऊत यांनी म्हटलं. यावर अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी संजय राऊतांनी अजित पवारांना दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितलं. “तुम्ही स्पष्टीकरण दिल्यानंतरही संजय राऊत म्हणाले की अजित पवार त्यांची बाजू मांडतील, असा सल्ला त्यांनी दिलाय”, असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. हा प्रश्न येताच, अजित पवारांनी तत्काळ, “कोण संजय राऊत?” असा प्रतिसवाल केला. “शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत” असं उत्तर पत्रकारांनी देताच, “मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, मग कोणाच्या अंगाला का लागावं?” असं प्रत्युत्तर पवारांनी दिलं.

अजित पवार म्हणाले की, “कोण संजय राऊत? मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, मग कोणाच्या अंगाला का लागावं? मी माझ्या आणि पक्षापुरतं बोललो.”