नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. बबनराव तायवाडे यांची उमेदवारी निश्चित केल्यानंतरही भाजपचा उमेदवाराचा शोध अद्याप सुरू आहे. तायवाडेंपेक्षा वरचढ असेल, असा एकही उमेदवार सध्यातरी भाजपकडे नसल्याने या मतदारसंघावरील पारंपरिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपला चांगलीच कसरत करावी लागेल.
गडकरी हे आगामी लोकसभेची निवडणूक लढणार असल्याने पदवीधर मतदारसंघात भाजपला पर्यायी उमेदवाराची निवड करायची आहे. गडकरी पदवीधर मतदारसंघाच्या मैदानात राहणार नसल्याने काँग्रेसच्या गोटात पहिल्यांदाच आशेचे वातावरण निर्माण झाले असून ही जागा भाजपकडून खेचून आणण्यासाठी पुरेपूर तयारी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने पदवीधर नोंदणी आणि प्रचाराच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या तुलनेत भाजपचे उमेदवाराचे नाव अद्याप निश्चित झालेले नसल्याने भाजप सध्या तरी प्रचारात मागे पडल्याचे चित्र आहे.
गंगाधरराव फडणवीस यांच्यानंतर नितीन गडकरी सतत या मतदारसंघातून निवडून येत आहेत. काँग्रेसने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाकडे यापूर्वी फारसे लक्ष पुरविलेले नव्हते. काँग्रेसने दरवेळी उमेदवार बदलले परंतु, गडकरी साऱ्यांना पुरून उरले होते. गेल्या निवडणुकीत बबनराव तायवाडे यांचा नितीन गडकरी यांनी पराभव केला होता. त्यावेळी तायवाडे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नव्हते.
ही निवडणूक पर्यायी उमेदवाराच्या भरवश्यावर जिंकायची असल्याने यंदा भाजपपुढे पेच निर्माण झाला आहे. गडकरींचा मतदारसंघावरील प्रभाव पाहता विजय सोपा असल्याचे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे मत आहे. परंतु, बबनराव तायवाडे यांचाही चाहता वर्ग मोठा आहे. यंदा फुले, शाहू, आंबेडकर पदवीधर संघटनादेखील अचानक सक्रिय झाली असून त्यांनी मतदार नोंदणी अत्यंत आक्रमकपणे राबविली आहे.शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही नोंदणीच्या कामासाठी भिडविण्यात आले आहे.
गडकरींचा उत्तराधिकारी कोण?
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. बबनराव तायवाडे यांची उमेदवारी निश्चित केल्यानंतरही भाजपचा उमेदवाराचा शोध अद्याप सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-10-2013 at 05:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is the successor gadakari