मंगळवारी (१३ जून) देशातील प्रमुख वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहेत, असा दावा करण्यात आला होता. तसेच संबंधित जाहिरातीत “राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे” असा संदेशही देण्यात आला होता. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर आता शिंदे गटाकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नवीन जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांचे फोटो लावले आहेत. या नवीन जाहिरातीवरूनही राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. संबंधित जाहिरातीवरून त्यांनी शिंदे गटावर टोलेबाजी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- “वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरूण…”, शिंदे गटाच्या नव्या जाहिरातीवरून अजित पवारांचा संताप, म्हणाले, “नऊ जणांची माळ…”

कालच्या जाहिरातीत फडणवीसांना डावललं होतं. तर नव्या जाहिरातीत फडणवीसांना मानाचं पान दिलं आहे. त्यामुळे फडणवीसांची कोंडी कोण करतंय, असं तुम्हाला वाटतं? यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “हे पाहा, जे स्वत:च्या कर्तृत्वाने पुढे जातात, त्यांची कुणीही कोंडी करू शकत नाही. मराठी भाषेत एक म्हण आहे, कोंबडा कितीही झाकला तरी तो आरवायचा राहत नाही. पहाट झाली की कोंबडा आरवतोच. इथे कोंबड्याची उपमा मी कुणालाही दिली नाही.”

हेही वाचा- “शिंदे गटाकडून चूक झाली तर…”, ‘त्या’ जाहिरातबाजीवर बावनकुळेंचं थेट विधान

“बोलण्याचं तात्पर्य हेच आहे की, जो व्यक्ती कर्तृत्वसंपन्न असतो. त्याच्यामध्ये नेतृत्वाचे गुण असतात. संघटना कौशल्यं असतं, पुढे जाण्याची ताकद असते. अशा व्यक्तीला कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर असं थांबवता येत नाही. हे निर्विवाद सत्य आहे. गेल्या ७५ वर्षाच्या इतिहासात हे सिद्ध झालं आहे. अशा व्यक्तीला काही वेळा दोन पावलं मागे जाऊन थांबावं लागतं. पण तो पुन्हा त्याच गतीने पुढे जातो. मी गेली कित्येक वर्षे देवेंद्र फडणवीसांचं कामकाज पाहतोय. पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून कामकाज करताना त्यांना पाहिलं आहे. त्यांच्यामागे आमदारांचाही संच आहे. त्यामुळे फडणवीसांची कुणी कोंडी करत असेल, असं मला वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is trapping devendra fadnavis through advertisement ajit pawar gave answer rmm
Show comments