Chief Minister of Maharashtra: विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबतचे मळभ दूर व्हायला चार दिवस लागले. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि. २७ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल असे सांगितले. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्यानंतर आता भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदी कुणाला बसवायचे, याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जोर देत असताना केंद्रीय नेतृत्व मात्र सर्व बाजूंचा विचार करताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात काल याविषयावर दीर्घ चर्चा झाल्याची माहिती वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा; भाजपा धक्कातंत्र अवलंबणार?
Chief Minister of Maharashtra: एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाजूला केल्यानंतर आता भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाबाबत चाचपणी सुरू झाली आहे.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-11-2024 at 08:48 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSअमित शाहAmit Shahदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024मुख्यमंत्रीManmohan Singhविनोद तावडेVinod Tawde
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will be next cm of maharashtra amit shah and vinod tawde discuss about maharashtra political scenario kvg