दीड वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असताना तीन महिन्यांपूर्वी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाले. शिंदे गटामुळे सरकारकडे बहुमत असताना भाजपाने अजित पवारांना युतीत का घेतलं? असा प्रश्न अनेकांना पडला होता. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्या पक्षाशी युती केली, तर हे प्रत्येकजण समजू शकतो. भाजपाने आधी शिंदे गटाशी युती केली. यानंतर बहुमत असताना अजित पवारांना युतीत का घेतलं? असा सवाल विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. एखादा राजकीय पक्ष तुमच्याबरोबर येऊ इच्छित असेल तर त्यांना युतीत न घेणं, ही राजनैतिक वास्तविकता असू शकत नाही. हा योग्य निर्णय असू शकत नाही, असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं. ते ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एका मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा- २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात शरद पवारांचा हात? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवारांना युतीत घेण्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकारणात नेहमीच आपली ताकद संघटित करावी लागते. तसेच आपली ताकद वाढवावी लागते. आज ‘इंडिया’ आघाडीकडून देशभरातील विरोधी पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला मोदीजी नको, एवढं एकच लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. अशावेळी एखादा राजकीय पक्ष आमच्याबरोबर येऊ इच्छित असेल तर त्यांना युतीत न घेणं, ही राजनैतिक वास्तविकता असू शकत नाही. तो योग्य निर्णय असू शकत नाही.”

हेही वाचा- “…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

“जर अजित पवार आमच्याबरोबर येऊ इच्छित असतील आणि त्यांची राजकीय ताकदही आहे. त्यामुळे आम्ही त्यांना बरोबर घेतलं. एकनाथ शिंदे आमच्याबरोबर आल्याने आमचं सरकार बनलं होतं, हे खरं आहे. सरकार चांगल्याप्रकारे चालतही होतं. आम्हाला काहीच समस्या नव्हती. पण तुमची ताकद आणखी वाढणार असेल तर त्याला नाकारलं जाऊ शकत नाही”, असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why ajit pawar join yuti while eknath shinde was given support devendra fadnavis reaction rmm
Show comments