Sharad Pawar on Baramati Lok Sabha : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवारांनी स्वतःचा गट स्थापन करून भाजपाला पाठिंबा दिला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केले. अजित पवार यांनी बारामतीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. माझ्याविरोधात सर्व कुटुंबीय एकत्र आले आहेत. मी बारामतीचा विकास केला, आमचा खासदार केंद्रातून निधी आणणार, असे अजित पवार प्रत्येक सभेत सांगत होते. मात्र तरीही बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना म्हणावी तशी मते मिळाली नाहीत. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मजेशीर आणि गंमतीमध्ये उत्तर दिले.

पुण्यात आज (दि. १७ जुलै) शरद पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांचे बदलते स्वरुप यावर आपली भूमिका मांडली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना विविध राजकीय प्रश्नांबाबत बोलते केले. यावेळी अजित पवार यांनी विकासकामे करूनही त्यांचा बारामतीत पराभव कसा काय झाला? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार एका वाक्यात म्हणाले, “अरे ती बारामती आहे.”

हे वाचा >> RSS on Ajit Pawar : ‘भाजपालाच आता अजित पवार नकोसे’, संघाच्या विवेक साप्ताहिकातील लेखावर शरद पवार गटाची मोठी प्रतिक्रिया…

म्हणून सुप्रिया सुळेला बारामतीमधून लीड

ही गोष्ट अधिक समजावून सांगताना पवार म्हणाले की, मतदारसंघातील लोकांशी तुमचा संवाद कसा आहे? त्यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. मात्र आता तसा संवाद होत नाही. बारामतीत जर मला कुणी भेटायला आले तर मला त्यांच्या वडीलांचे नाव विचारावे लागते. तेव्हा कळते हा कुणाच्या घरातला आहे. दोन पिढीतील हा संवाद कायम ठेवला तर लोक कधीही नेत्याला विसरत नाहीत. त्यामुळे बारामतीत कुणी काहीही म्हटले तरी मला खात्री होती की, सुप्रिया सुळेलाच अधिक मतदान होईल. घरातलाच विरोधी उमेदवार असतानाही सुप्रिया सुळेला ४० हजारांचे लीड दिले. त्याचे कारण माझा दोन पिढ्यातील संवाद कारणीभूत आहे.

Pimpri, Ajit Pawar, ajit gavhane,
पिंपरी : अजित पवारांना धक्का! शहराध्यक्ष गव्हाणेंसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश (संग्रहित छायाचित्र)

अजित पवार परत आले तर?

“अजित पवार राष्ट्रवादीतून वेगळे झाले असले तरी ते कुटुंबाचा भाग आहेतच. कुटुंब कधी वेगळे होत नाही. पण त्यांना पक्षात पुन्हा यायचे असेल तर मला आधी पक्षाला विचारावं लागेल. कारण फुटीनंतर ज्यांनी संघर्षाचा काळ अनुभवला त्यांचे म्हणणे काय आहे? याला जास्त महत्त्वाचे आहे. तरीही ही जर तरची गोष्ट आहे”, असे शरद पवार म्हणाले.