लोकसभा निवडणूक ही कुणाची आहे? तर ती गद्दार विरुद्ध निष्ठावान अशी आहे. आज महाशिवरात्र आहे आणि महिला दिन या दोन्ही गोष्टी आहेत. पण मणिपूरमध्ये काय घडलं त्या महिला बोलूही शकत नाहीत. महिला कुस्तीगीर त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याचं काय? महिला दिनाच्या शुभेच्छा कोणत्या तोंडाने द्यायच्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. महिला दिनानिमित्त माझी महिलांना विनंती आहे की ज्या महिलांनी आता महिशासूर मर्दिनीचं रुप घ्या आणि देश गिळायला निघालेल्या महिशासूर नाही पण हुकूमशहासुराचा खात्मा करा. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
अमित शाह यांना नामांतर कुणी केलं ते माहीत नाही, शिवसेना कुणाची माहीत नाही
अमित शाह यांना विचारा शिवसेना कुणाची. पण ज्या देशाच्या गृहमंत्र्याला धाराशिव आणि छत्रपती संभाजी नगर हे नामांतर कुणी केलं ते माहीत नाही. ज्याला शिवसेनेचा प्रमुख कोण माहीत नाही. अमित शाह यांनीच सांगावं मातोश्रीवर २०१९ ला काय सत्यनारायणाच्या पूजेला मातोश्रीवर आले होते का? मला फोन करायचे उद्धवजी तुम्हाला इकडे यायचे, तिकडे यायचे आहे. मला फॉर्म भरुन घेताना कशाला बोलवत होतात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलं.
२०१९ ला मोदींचा फॉर्म भरायला उद्धव ठाकरे कशाला हवा होता?
सबका साथ आणि दोस्तों का विकास हे यांचं धोरण आहे. २०१९ ला मोदींचा फॉर्म भरायला उद्धव ठाकरे पाहिजे होता. तेव्हा मी पक्ष प्रमुख होतो आणि आहेच. सेनेची मतं हवी होती म्हणून आहेत. माझे आमदार, खासदार चोरले असतील पण लोकांचं प्रेम कसं काय चोराल? ही शिवसेना माझी आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. राहुल नार्वेकर हा लबाड आहे आता भाजपाकडून निवडणूक लढवतो आहे असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. तुम्हाला लोकसभेची निवडणूक मिळवण्याची लालूच दाखवल्याने तुम्ही माझ्याविरोधात निर्णय दिला आहे. असा माझा आरोप आहे.
भाजपा, मिंधे, या ठिकाणी आणि त्याठिकाणी असलेले ते सत्तर हजार कोटीवाले म्हणजे निर्लज्जं सदासुखी आहेत. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेना प्रमुख अनेक शिवसैनिकांना लहान असल्यापासून ओळखत आले आहेत, मी देखील अनेकांना माझ्या लहानपणापासून पाहिलं . आदित्य आणि तेजसही त्यांना काका म्हणत होते. तो माणूस असा फिरतो?
भाजपाने दगा दिला, पाठीत वार केला त्यामुळेच
भाजपाने दगा दिला, पाठीत वार केला. त्यामुळे मला मुख्यमंत्री व्हावं लागलं. भाजपाने दगा दिल्यानंतर मी काय करणार होतो? हिंदूहृदय सम्राट ही बाळासाहेब ठाकरे यांना सगळं जग ओळखतंच. मी पुत्र म्हणून त्यांना वचन दिलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेन. मी मुख्यमंत्री होईन असं वचन दिलं नव्हतं. आता वचनपूर्तीची जबाबदारी तुम्हा सगळ्यांची आहे. वापरा आणि फेका अशी भाजपाची नीती आहे. गरज होती तेव्हा मातोश्री निवडून आल्यावर अदाणी ही यांची प्रवृत्ती.