Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार कौशल्य आणि एकूणच कार्याचा गौरव करण्यासाठी गेल्यावर्षी नौदल दिनाचे औचित्य साधून पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला. १५ फूट उंचीचा चबुतरा आणि २८ फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी येथील रचना होती. अतिशय दिमाखात उभा असलेला हा पुतळा गेल्या आठ महिन्यांत पर्यटकांचे तसंच शिवप्रेमीचं आकर्षण केंद्र बनला होता. मात्र, सोमवारी दुपारी अचानक तो कोसळल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. दरम्यान या प्रकरणी कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिताच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. भ्रष्टाचार, फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणे आदी कलमांचा यात समावेश आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “गंजलेल्या नट-बोल्टमुळे…”, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कंत्राटदारांवर गुन्हा दाखल
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse at Malvan : पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत स्थानिक नागरीक आणि पर्यटकांनी यापूर्वी चिंता व्यक्त केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याने २० ऑगस्ट रोजी दिलेल्या इशाऱ्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नाही.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-08-2024 at 12:17 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSकोकणKonkanछत्रपती शिवाजी महाराजChhatrapati Shivaji Maharajमराठी बातम्याMarathi Newsसिंधुदुर्गSindhudurg
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why chhatrapati shivaji maharaj 35 foot tall statue collapsed at rajkot fort malvan sindhudurg maharashtra sgk